पांढऱ्या केसांची समस्या –
आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.
केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, अयोग्य आहार, आहारातील व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता, थायरॉईड ग्रंथीतील समस्या आणि प्रदूषण अशा विविध कारणांमुळे केस अकाली पांढरे होत असतात.
पांढरे केस काळे करण्यासाठी हे करा उपाय..
कडीपत्ता –
कडीपत्ता खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्यावे व हे तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा. या उपायामुळे पांढरे केस काळे करण्यासाठी मदत होते.
भृंगराज –
भृंगराजपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.
चहापावडर –
पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. यासाठी चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथ्याने पांढरे झालेले केस धुवावेत.
कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबू रस घालावा. ही घट्ट पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. पांढरे केस काळे करण्यासाठी हा उपायही उपयोगी आहे.
आवळा –
आवळा पावडरमध्ये लिंबू रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. तसेच आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.
कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. पांढरे केस काळे करण्याचा हा उपायही उपयोगी आहे.
Read Marathi language article about White hair problem home remedies. Last Medically Reviewed on February 20, 2024 By Dr. Satish Upalkar.