ओठावर जर येण्याची कारणे –
अंगातील उष्णता, चहा कॉफी वारंवार पिण्याची सवय, पोट साफ न होणे, पोटातील जंत अशा विविध कारणांनी ओठांवर जर येत असते.
ओठावर जर येणे यावर घरगुती उपाय –
- ओठांवर जर आल्यास अर्धा चमचा धणे व अर्धा चमचा जिरे बारीक करून ते पाण्यात मिसळून प्यावे.
- ओठावर जर आलेल्या ठिकाणी मध लावल्यास काही प्रमाणात आराम मिळतो.
- तोंडाला जर आल्यावर जिरेपूड मधात मिसळून ती ओठांना लावावी.
ओठाला जर येणे यावर हे घरगुती उपाय उपयोगी पडतात.
ओठाला जर आल्यास काय खाऊ नये ..?
- तोंडाला जर आल्यावर तिखट, मसालेदार, आंबट व खारट पदार्थ खाणे टाळावे.
- जास्त गरम पदार्थ खाणे टाळा.
- चहा, कॉफी वारंवार पिणे टाळावे.
- तंबाखू, सिगारेट, मद्यपान अशी व्यसने टाळा.
तोंडाला जर आल्यावर काय करावे ..?
- अन्न सावकाश चावून खावे.
- तोंडाची स्वच्छता ठेवा.
- रोजच्या रोज दात घासावेत.
- दात घासण्यासाठी मऊ ब्रीसल्स असणाऱ्या ब्रशचा वापर करा. जास्त जुने झालेले ब्रश वापरणे टाळा.
- गालावर किंवा ओठांवर दात लागून जखम होत असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या.
हे सुध्दा वाचा – तोंड येणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Mouth sores, causes and home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.