नागीण आजार – Shingles :

नागीण आजाराला Shingles किंवा herpes zoster ह्या नावाने ओळखले जाते. नागीण रोगात व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे त्वचेवर वेदनादायक असे पुरळ येत असतात. नागीण आजारासाठी varicella zoster (VZV) हे व्हायरस कारणीभूत असतात. तसेच हाचं व्हायरस हा कांजिण्या (chickenpox) ह्या आजारासाठीही कारणीभूत असतो.

नागीण रोगाची कारणे :

आपणास कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊन गेलेला असल्यास त्याचा varicella zoster व्हायरस हा छुप्या स्वरूपात शरीरात मज्जातंतूमध्ये राहतो. आणि काही वर्षांनी जेंव्हा आपली इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) कमी होते तेंव्हा, त्वचेवर वेदनायुक्त पुरळ येऊन नागीण आजार होत असतो. शरीराच्या कोणत्याही भागावर नागिणीचे पुरळ येऊ शकतात.

नागीण आजाराची लक्षणे :

नागीणमध्ये सुरवातीला त्वचेवर असे पुरळ येतात. त्यानंतर काही दिवसांनी त्या पुरळामध्ये पाणी धरते व त्याठिकाणी वेदना होऊ लागते. याशिवाय काही जणांना ताप येणे, उजेड सहन न होणे, थकवा येणे असे त्रासही होऊ शकतात. साधारण दोन ते सहा आठवड्यापर्यंत नागीणमुळे त्रास होऊ शकतो. यावर उपचारासाठी antiviral औषधांचा उपयोग केला जातो.

नागीण रोग आणि आहार पथ्य (diet plan) :

नागीण आजारामध्ये आहारात व्हिटॅमिन A, B-12, C आणि E युक्त पदार्थ तसेच झिंक, अमीनो ऍसिड, लाइझिन (Lysine) युक्त आहार पदार्थ समाविष्ट करावेत.

नागीण रोग झाल्यावर काय खावे..?
नागीण आजार झाल्यास पचनास हलका असणारा आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, नारंगी आणि पिवळी फळे, टोमॅटो, पालक, धान्ये व कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस यांचा जरूर समावेश करावा. कारण या सर्व पदार्थात व्हिटॅमिन्स, झिंक, लाइझिन असे पोषक घटक असतात.

नागीण आजार झाल्यास काय खाऊ नये..?
नागीण आजारात साखरेचे गोड पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईस क्रीम, पांढरा ब्रेड, खारट पदार्थ, फास्टफूड, चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये. तसेच कोल्ड्रिंक्स, दारू पिणे टाळावे. आयुर्वेदात विसर्प म्हणजेचं नागीणीच्या आजारात पित्त वाढवणारा आहार खाणे टाळावे असे सांगितले आहे. त्यानुसार काही दिवस पित्त वाढवणारे तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

हे सुद्धा वाचा – नागीण आजाराविषयी माहिती व उपचार जाणून घ्या.

Read Marathi language article about herpes zoster disease diet plan tips. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.