Nose blocked by cold home remedies in Marathi.
सर्दीमुळे नाक बंद होणे –
सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो. सर्दीमुळे नाक बंद होणे यावर कोणते उपाय करावेत याची माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितली आहे.
नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय –
उपाय क्रमांक 1 –
सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद नाक मोकळे होण्यास मदत होते.
उपाय क्रमांक 2 –
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.
उपाय क्रमांक 3 –
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे बंद झालेले नाक मोकळे होते.
उपाय क्रमांक 4 –
नाक बंद झाल्यास कांदा बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे बंद नाक मोकळे होईल.
उपाय क्रमांक 5 –
सर्दीने नाक बंद झाल्यास थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून बंद नाक मोकळे होईल.
उपाय क्रमांक 6 –
सर्दीने नाक बंद झाल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. आंघोळीच्या वेळी नाक साफ करा. तसेच गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे बंद नाक मोकळे होण्यास मदत होते व फ्रेशही वाटते.
हे सुध्दा वाचा – सर्दी वरील उपाय जाणून घ्या..
In this article information about Naak band hone upay in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar.