Dr Satish Upalkar’s article about Headache Tablet in Marathi.
डोकेदुखी झाल्यास त्यावर वेदनाशामक गोळी घेण्याकडे अनेकांचा कल असतो. कित्येकजण तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर डोकेदुखी ची गोळी घेऊन खात असतात. ही बाब चिताजनक अशीच आहे. कारण अशा वेदनाशामक गोळ्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यासाठी येथे डोकेदुखी वर कोणती गोळी घ्यावी याची माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.
डोकेदुखीस कारणीभूत असणारे घटक –
- अयोग्य आहार म्हणजे वारंवार मसालेदार पदार्थ, तेलकट, तिखट, खारट पदार्थ, फास्टफूड खाण्याची सवय,
- चहा-कॉफी अधिक पिणे,
- स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसणे,
- अपूर्ण झोप,
- मानसिक ताणतणाव,
- अतीप्रवास,
- बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव,
- बद्धकोष्ठता (रोजच्या रोज पोट साफ न होणे),
- डोक्याला मार लागणे,
- स्पॉन्डिलायटिस, साइनसचा त्रास, ऍसिडिटी, दातदुखी, डोळ्यांच्या समस्या किंवा ब्रेन ट्युमर, मेंदूचा कर्करोग यासरखे गंभीर आजार,
- सिगारेट, तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसन,
- वातावरणात होणारे बदल, हवेचे प्रदूषण,
- हार्मोन्समधील असंतुलन अशा अनेक कारणे डोकेदुखीस कारणीभूत ठरतात.
डोकेदुखी वर गोळी कोणती घ्यावी ..?
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण डोकेदुखी वर योग्य ती वेदनाशामक गोळी घेऊ शकता. प्रामुख्याने Acetaminophen, Paracetamol, Ibuprofen, Aspirin ह्या औषधांची गोळी डोकेदुखी वर वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते. या औषधांमुळे डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. मात्र या औषधांचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने या वेदनाशामक गोळ्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
डोकेदुखी साठी गोळी घेताना घ्यायची काळजी –
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोकेदुखीवर कोणतीही वेदनाशामक गोळी घेऊ नका.
- डोकेदुखी आहे म्हणून वारंवार वेदनाशामक गोळ्या खाणे टाळा.
- औषधांच्या दिलेल्या मात्रेपेक्षा अधिक मात्रेत गोळ्या खाऊ नका.
- शक्यतो काहीतरी खाल्यानंतरच अशी गोळी घ्यावी.
- डोकेदुखी ची गोळी घेताना पुरेसे पाणी प्यावे. तसेच दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा.
- डोकेदुखी ची गोळी खाण्यापूर्वी किंवा गोळी खाल्यानंतर तिखट मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
- डोकेदुखी ची गोळी खाल्यानंतर काहीवेळ झोप घ्यावी.
- जर तुम्हाला किडनीचे विकार, रक्त पातळ होण्याची समस्या (bleeding problem), यकृताचे आजार, दमा, अल्सर असे त्रास असल्यास aspirin, ibuprofen यासारखी वेदनाशामक औषधे घेणे टाळा.
- जर तुम्हाला किडनीचे किंवा यकृताचे विकार असल्यास acetaminophen हे औषध घेणे टाळले पाहिजे.
डोकेदुखी वर उठसूठ गोळी घेण्यापेक्षा डोकेदुखीमध्ये खालील सुरक्षित असे घरगुती उपाय करून डोकेदुखी थांबते का ते पहावे.
डोकेदुखीमध्ये हे करा घरगुती उपाय ..
- डोकेदुखीमध्ये आल्याचा तुकडा चावून खाल्याने आराम मिळतो.
- काही लवंगा तव्यावर गरम करून रुमालात घालून त्यांचा वास हुंगल्यास डोकेदुखी दूर होते.
- कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही डोकेदुखी थांबते.
- वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही डोकेदुखीमध्ये आराम पडतो.
अनेकांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असतो. अशावेळी ते उठसूठ डोकेदुखी साठी गोळी घेत असतात. यापेक्षा जर त्यांनी आपल्या जीवनशैलीत थोडा बदल केल्यास डोकेदुखीचं होणार नाही. यासाठी नेमके काय केले पाहिजे याची माहिती खाली दिलेली आहे. त्या टिप्सचा अवलंब केल्यास कधीही डोकेदुखी होणार नाही.
डोकेदुखी होऊ नये यासाठी घ्यायची काळजी –
- संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
- दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
- दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
- मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
- चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
- स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
- जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
- नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
- मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
- वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
- तंबाखू, गुटखा, सिगरेट, मद्यपान अशी व्यसन करणे टाळा.
डोकेदुखीमध्ये डॉक्टरांकडे कधी जावे ..?
अचानक डोकेदुखी वाढणे, डोळ्यांनी वस्तू डबल दिसणे, तोंड वाकडे होणे, बोलण्यास त्रास होणे, फिट्स येणे यासारखी लक्षणे जर डोकेदुखीबरोबर जाणवत असल्यास हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करणे आवश्यक आहे.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
हे सुध्दा वाचा – मायग्रेन डोकेदुखीची माहिती व उपाय जाणून घ्या..
Information about Headache Pain Relief Tablet in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.