सर्दीमुळे नाक बंद होणे –
सर्दी झाल्याने नाक बंद होत असते. सर्दीमुळे नाकात शेंबूड जमा होऊन नाक बंद होते. अशावेळी नाक बंद झाल्यामुळे अगदी श्वास घेताना त्रास होत असतो.
नाक बंद होणे यावरील 5 घरगुती उपाय –
उपाय क्रमांक 1 –
सर्दीमुळे नाक बंद झल्यास चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण प्यावे. यामुळे बंद नाक मोकळे होण्यास मदत होते.
उपाय क्रमांक 2 –
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही बंद झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.
उपाय क्रमांक 3 –
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे बंद झालेले नाक मोकळे होते.
उपाय क्रमांक 4 –
नाक बंद झाल्यास कांदा बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे बंद नाक मोकळे होईल.
उपाय क्रमांक 5 –
सर्दीने नाक बंद झाल्यास थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून बंद नाक मोकळे होईल.
उपाय क्रमांक 6 –
सर्दीने नाक बंद झाल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. आंघोळीच्या वेळी नाक साफ करा. तसेच गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे बंद नाक मोकळे होण्यास मदत होते व फ्रेशही वाटते.
हे सुध्दा वाचा – सर्दी वरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about Nose blocked by Common cold home remedies. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.