मुतखडावर घरगुती उपाय – मुतखडा असल्यास हे करा घरगुती उपाय..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

मुतखडा आणि घरगुती उपाय :

मुतखडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. यूरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सॅलिक ऍसिड असे अनेक रासायनिक घटक लघवीत असतात. ह्या घटकांचे लघवीतील प्रमाण वाढल्यास मुतखडे बनतात.

मुतखड्यामुळे पोटात वेदना होत असतात. या शिवाय लघवी करताना त्रास होणे, लघवीत रक्त येणे, मळमळ व उलट्या होणे असे त्रास होत असतात. यासाठी याठिकाणी मुतखडावर घरगुती उपाय याविषयी माहिती मराठीत दिली आहे. यायोगे आपणास मुतखड्याच्या त्रासापासून निश्चितच आराम मिळेल.

मुतखडावरील घरगुती उपाय :

लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल –
ग्लासभर पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखडासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.

डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस पिणे किंवा डाळींबाचे दाणे खाणे मुतखडावर प्रभावी असते. 

तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.

कुळथाचं कढण –
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडा बारीक होऊन पडून जातो.

कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.

शहाळ्याचे पाणी –
मुतखड्याचा त्रास असल्यास शहाळ्याचे पाणी प्यावे. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मुतखडे सहज विरघळून निघून जाण्यास मदत होते.

मुतखड्याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीच्या कार्यावरही होऊ शकतो यासाठी मुतखडा त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. मुतखड्यावरील आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Web title – Mutkhada home remedies in Marathi.