किडनी स्टोनची लक्षणे :
अनेकांना मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या भेडसावत असते. मुतखड्याचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असा असतो. लघवीत कॅल्शियम ऑक्सलेट आणि यूरिक ऍसिड सारख्या पदार्थांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे ही समस्या होत असते. याठिकाणी मुतखड्यामध्ये जाणवणारी लक्षणे व त्यावरील उपचार याविषयी माहिती दिली आहे.
मुतखड्याचा आकार लहान असल्यास सहसा जास्त त्रास होत नाही, परंतु जर मुतखडा आकाराने मोठा असल्यास त्यामुळे मूत्र प्रणालीमध्ये अडथळा येऊ शकतो. अशावेळी त्यामुळे पोटात किंवा कंबरेत असह्य वेदना होणे, उलट्या व मळमळ होणे असे त्रास होऊ शकतात.
मुतखडा असल्यास जाणवणारी लक्षणे (Kidney stone symptoms) :
• ज्या बाजूच्या किडणीत मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होणे,
• वारंवार लघवीस झाल्यासारखे वाटणे,
• लघवी करताना जळजळ होणे,
• लघवी करताना त्रास होणे,
• थेंब थेंब लघवी होणे, काहीवेळा लघवीत रक्त येणे,
• तसेच मुतखड्यामुळे लघवी थुंबून राहिल्याने मळमळ व उलट्या होणे, ताप येणे यासारखी मुतखड्याची लक्षणे जाणवतात.
मुतखडा असल्यास हे करा उपाय..
• दिवसभरात पुरेसे म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे मुतखडे निघून जाण्यास मदत होते.
• दररोज चमचाभर लिंबाच्या रसात एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे.
• दररोज तुळशीचा रस किंवा पाने चावून खल्यानेही किडनी स्टोन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
• सकाळी उपाशीपोटी पानफुटीची दोन पाने चावून खावीत. याच्या नियमित सेवनाने मुतखडे बारीक होऊन लघवीवाटे बाहेर पडतात.
• डाळींबाचा रस किंवा शहाळ्याचे पाणी पिणेही किडनी स्टोनवर उपयोगी असते.
Read Marathi language article about Kidney stone symptoms and home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.