कोरोना वायरसची लक्षणे – कोरोना विषाणूची लागण झाल्यास कोणकोणती लक्षणे असतात याविषयी जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

कोरोना वायरस (Coronavirus) :

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे (व्हायरसमुळे) 250 पेक्षा आधीक लोक मरण पावले आहेत. तर आतापर्यंत 12000 हून अधिक लोकांना या विषाणूसंबंधित न्यूमोनियाचा संसर्ग झाला आहे. चीननंतर जगभरातही कोरोना विषाणूचे रुग्ण आढळल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना विषाणूस आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी कोरोना वायरसची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मराठी माहिती दिली आहे.

कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत असल्याने याची लागण होऊ नये यासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत.

कोरोना वायरसची लक्षणे :

Coronavirus Symptoms in Marathi.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास ताप, सर्दी, खोकला, श्वास लागणे, शिंका येणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, अस्वस्थता, डोकेदुखी, थकवा येणे यासारखी कोरोनाची लक्षणे असतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना :

आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत.
• दिवसातून अनेकदा हात स्वच्छ धुवावेत. हात धुण्यासाठी गरम पाणी व साबण किंवा अल्कोहलयुक्त हॅन्ड सेनेटायझरचा वापर करावा.
• तोंडाला मास्क लावावे.
• खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमालाचा वापर करावा. 
• सर्दी आणि फ्लूची लक्षणे असलेल्या लोकांजवळ जाणे टाळा.
• सर्दी, खोकला, ताप यासारखा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार घ्यावेत.
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल स्टोअरमधून स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे टाळावे. 
• लहान मुलांना ताप आला असल्यास एस्परिन असणारी औषधे देणे टाळावे.
• दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.
• बाहेरचे उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
• कच्चे मांस, अंडी खाणे टाळावे. 
• जंगली प्राण्यांशी संपर्क टाळावा.
कोरोना प्रमाणेच स्वाईन फ्ल्यू विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Symptoms of Coronavirus in Marathi information.