साधी गाठ आणि कॅन्सरची गाठ –
आपल्या शरीरावर लहान मोठ्या आकाराची गाठ येत असते. शरीरावर आलेली प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. कारण बऱ्याच गाठी ह्या किसतोड, सिस्ट, चरबीच्या गाठी वैगेरे साधारण कारणामुळे येत असतात. तसेच काहीवेळा कॅन्सर मुळेही गाठ येऊ शकते. अशावेळी त्या गाठीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असते.
ट्युमरचे प्रकार –
ट्युमरचे बिनाइन (Benign) आणि मैलिग्नेंट (Malignant) असे दोन प्रकार असतात. यातील बिनाइन गाठ ही धोकादायक नसते. बिनाइन गाठ ही पॉलीप्स, फायब्रॉइड (गर्भाशयातील गाठी), लिपोमा (चरबीच्या गाठी) अशा प्रकारच्या असतात.
तर मैलिग्नेंट प्रकारची गाठ ही कॅन्सरची असते. कॅन्सरचे ट्युमर हे शरीरावरील त्वचा, मांस, हाडे यामध्ये होऊ शकतात तसेच शरीरातील पोट, यकृत अशा विविध अवयवांत देखील होतात. रक्त प्रवाहाबरोबर ट्युमरमधील कॅन्सरच्या पेशी ह्या शरीराच्या इतर भागात पसरत असतात.
कॅन्सरची गाठ कशी ओळखावी..?
कॅन्सरच्या गाठीत सुरवातीला सहसा वेदना नसतात. म्हणजे ती गाठ दुखत नाही. कॅन्सरच्या गाठीत विकृत पेशींची अनियंत्रित वाढ होऊन ती गाठ झपाट्याने वाढू लागते. अशावेळी त्या वाढलेल्या गाठीतून रक्तस्त्राव होऊ शकतो तसेच तेंव्हा त्या गाठीमध्ये तीव्र वेदना सुद्धा होऊ लागतात.
स्तनात किंवा काखेत गाठ असणे, शौचाच्या जागी गाठ असणे किंवा डोक्यात गाठ असल्यास डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे. तसेच शरीरावर कोठेही गाठ दिसून आल्यास व त्या गाठीचा आकार वाढत असल्यास डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेणे गरजेचे असते.
कॅन्सरच्या गाठीचे निदान –
गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याची खात्री करण्यासाठी डॉक्टर काही तपासण्या करण्यास सांगतील. एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय अशा तपासण्या यावेळी केल्या जातात. तसेच रक्त चाचण्या आणि गाठीची बायोप्सी चाचणीसुद्धा केली जाते. बायोप्सीमध्ये सुईद्वारे गाठीतील ऊतींचा नमुना काढून घेऊन त्याची लॅबमध्ये तपासणी केली जाते.
कॅन्सरच्या गाठी आणि उपचार –
कर्करोगाच्या गाठींवर आजाराची तीव्रता व गाठेचे स्वरूप विचारात घेऊन ऑपरेशन, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी याद्वारे उपचार केले जातात.
हे सुध्दा वाचा – कॅन्सरची लक्षणे कशी असतात ते जाणून घ्या..
Read Marathi language article about how to identify a cancer tumor. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.
2018 me mummy ko brest cancer huwa tha .. chemo therapy me couri huwa ek Sala 1.50 Salam pehel firse ek noouds brest me seen huwa f n s Kiya to only blad hai ye seen huwa hai ..but uss jagaha gadth position wohi hai ..kuch problem to nahi hai na sir