गरोदरपणात योग्य ती काळजी घेतल्यास आई आणि बाळ अशा दोघांचेही आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. प्रेग्नन्सीमध्ये योग्य ती काळजी कशी घ्यावी याविषयीच्या महत्वाच्या सात टिप्स खाली दिलेल्या आहेत. या प्रेग्नन्सी स्मार्ट टिप्समुळे आपले गरोदरपण हेल्दी आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल.
गर्भावस्थेतील स्मार्ट टिप्स (Pregnancy tips) :
1) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या –
गरोदरपण निरोगी आणि सुरक्षित होण्यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्यावी. आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे, फॉलिक ऍसिड, लोहाच्या गोळ्या वेळेवर घ्यावीत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही परस्पर औषध घेऊ नये. गरोदरपणात काही त्रास जाणवल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2) योग्य आहार घ्या –
गरोदरपणात संतुलित व पौष्टिक आहार घ्या. यामुळे गर्भिणी आणि पोटातील बाळाचे योग्य पोषण होईल. गरोदरपणात वेळेवर आहार घ्यावा. आहारात भाजी, भाकरी, पोळी, भात, उसळ यांचा समावेश असावा. गरोदरपणात दूध व दुधाचे पदार्थ, विविध फळे, पालेभाज्या, सुखामेवा, अंडी, मांस, मासे यांचाही आहारात जरूर समावेश करावा. दिवसभरात पुरेसे पाणीही प्यावे.
3) हलका व्यायाम करा –
गरोदरपणात हलका व्यायाम करणे आवश्यक असते. परंतु जास्त प्रमाणात व्यायाम करणे टाळावे. प्रेग्नन्सीत डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम करावा. जास्त अवघड व त्रासदायक व्यायाम करु नये. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून व्यायाम सुरु करू नका.
4) कामे करताना काळजी घ्या –
गरोदरपणात घरातील हलकी कामे करावीत. जास्त थकवा आणणारी कामे करणे टाळावे. जड वस्तू उचलणे किंवा ढकलणे टाळावे.
5) पुरेशी विश्रांती घ्या –
गरोदरपणात पुरेशी विश्रांती व झोप घेणे आवश्यक आहे. दुपारच्या वेळीही थोडावेळ आराम करावा. रात्री जागरण करणे टाळावे. तसेच मानसिक ताण घेऊ नये.
6) प्रवास करताना काळजी घ्यावी –
गरोदरपणात शक्यतो दूरचा प्रवास करणे टाळावे. दुचाकीवरून प्रवास करू नये. कारमधून प्रवास करताना सीटबेल्टचा जरूर वापर करावा.
7) व्यसनांपासून दूर राहा –
प्रेग्नन्सीमध्ये सिगारेट, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर रहावे. तसेच इतर व्यक्ती सिगारेट स्मोकिंग करीत असताना त्या धुराच्या संपर्कात राहू नये.
गर्भावस्थेत ह्या टिप्सचे पालन केल्यास आई आणि बाळ या दोघांचेही आरोग्य हेल्दी आणि सुरक्षित राहण्यास मदत होईल.
Read Marathi language article about Healthy Pregnancy tips. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.