गरोदरपणात कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे..? (Healthy Pregnancy Tips)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

When to Call the Doctor During Pregnancy, Healthy Pregnancy Tips & Care in Marathi

गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला केंव्हा घ्यावा..?

गर्भाशयात बाळाची वाढ जशी होत जाईल तशी आई आणि बाळ यां दोघांच्याही आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढते आणि अशा अवस्थेत छोटीशी चुक देखिल बाळासाठी घातक ठरु शकते. यासाठी गरोदरपणात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधानी, दक्षता घ्यावी लागते.

कोणती लक्षणे दिसतात तात्काळ जावे डॉक्टरांकडे..?
गरोदरपणात खालिल लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा –
• गर्भाशयातील बाळाची हालचाल कमी झाल्यासारखी वाटणे,
• ‎गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यानंतर योनीतून स्त्राव येणे, गरोदरपणात रक्त जाणे, पाणी येत असल्यास ही चिंतेची बाब असू शकते. अशा वेळी पूर्ण आराम करावा व आपल्या डॉक्टरांकडे जावून तपासणी करून घ्यावी. आराम व उपचार न केल्यास गर्भपातही होऊ शकतो.
• ‎सतत उलटी होणे. पहिल्या तीन महिन्यात उलटी व मळमळ होणे सामान्य बाब आहे मात्र त्यानंतरही उलटी होत राहिल्यास, उलटीचे प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
• ‎अशक्तपणा जाणवणे,
• ‎रक्तपांढरी (अॅनेमिया) होणे,
• ‎ताप येणे, अतिसार होणे, ओटीपोटात दुखणे,
• ‎पायावर सूज येणे, रक्तदाब वाढल्यामुळे अशी सूज येऊ शकते. त्यावर उपचार न केल्यास बाळ व आईच्या जीवाला धोका पोहचू शकतो. म्हणून शेवटच्या 4 महिन्यात रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. पायावर सूज येत असेल तर आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे.
यासारखी लक्षणे व्यक्त झाल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा त्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होते.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.