केसात खाज येणे – Itchy scalp :

केसांमध्ये खाज येण्याची समस्या अनेकांना असते. केसात अनेक कारणांनी खाज येऊ शकते. प्रामुख्याने केसातील कोंडा, उवा, इन्फेक्शन, ऍलर्जी, सोरायसिस सारखे विशिष्ट आजार अशी विविध कारणे याला जबाबदार असतात.

केसात खाज होण्याची कारणे :

  • केसात कोंडा (Dandruff) झाल्यामुळे,
  • केसात इन्फेक्शन झाल्याने,
  • केसात उवा झाल्याने,
  • हेअर डाय किंवा विशिष्ट तेलाच्या ऍलर्जीमुळे,
  • केसांची स्वच्छता व निगा न ठेवल्याने,
  • डोक्याच्या त्वचेला सूज आल्यामुळे (seborrheic dermatitis),
  • वातावरणातील बदलामुळे जसे पावसाळ्यात भिजल्याने किंवा उन्हाळ्यात केसातील घामामुळे,
  • हार्मोन्समधील बदलांमुळे,
  • मानसिक तणावामुळे,
  • तसेच सोरायसिस, शीतपित्त, ऍलर्जी, eczema, डायबेटीस ह्या आजारांमुळेही केसात खाज सुटू शकते.

केसातील खाज कमी करण्याचे उपाय :

सिताफळाच्या बिया –
केसात उवा झाल्यामुळे खाज होण्याची समस्या असल्यास सिताफळाच्या बियांच्या चूर्णाची पेस्ट करून रोज अर्धा तास केसांच्या मुळांशी लावावी व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत.

खोबरेल तेल –
डोक्याची त्वचा कोरडी झाल्यामुळे केसात खाज येत असल्यास त्यावर खोबरेल तेल उपयुक्त ठरते. यासाठी केसांना खोबरेल तेलाने मालिश केल्यास खाजेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

कोरपडीचा गर –
अंघोळ करण्यापूर्वी 15 मिनिटे आधी केसांच्या मुळांना एलोवेरा जेल किंवा कोरपडीचा गर लावावा व थोड्यावेळाने आंघोळ करताना केस धुवावेत. असे नियमित केल्याने केसातील खाज दूर होईल.

लिंबू रस –
पाच चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबूरस मिसळावे. हे मिश्रण आंघोळ करण्यापूर्वी केसांच्या मुळांना चांगल्या पद्धतीने लावावे. अर्ध्या तासानंतर आंघोळ करताना केस हर्बल शॅम्पूने धुवावेत. यामुळे केसातील कोंडा दूर होऊन केसातील खाज कमी होते.

केसात जास्त खाज येत असल्यास Salicylic acid किंवा Ketoconazole हे औषध घटक असणारे शॅम्पूचा वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा..
केसातील कोंडा दूर करण्यासाठी उपयुक्त उपाय

Read Marathi language article about Itchy scalp problem Causes and Home remedies. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.