फाटलेल्या टाचांवर उपाय जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

टाचा फाटण्याचा त्रास प्रामुख्याने थंडीच्या दिवसात अधिक प्रमाणात होत असतो. याशिवाय अनवाणी चालणे, आरामदायी चपला न वापरणे, अधिक काळ उभे राहण्याची सवय यासारख्या अनेक कारणांमुळे पायाच्या टाचा फुटत असतात. यासाठी येथे फाटलेल्या टाचांवर उपाय यांची माहिती खाली दिली आहे.

फाटलेल्या टाचांवर उपाय :

मध –
त्वचा नैसर्गिकरीत्या मॉइश्चराइज करण्यासाठी मध खूप उपयोगी ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी टाचा स्वच्छ धुवून त्याठिकाणी मध लावावे. यामुळे टाचेच्या भेगा लवकर कमी होतात. फाटलेल्या टाचांवर हा घरगुती उपाय खूप उपयोगी ठरतो.

खोबरेल तेल –
खोबरेल तेलसुद्धा त्वचा मॉइश्चराइज करण्यास मदत करत असते. त्यामुळे टाचा फुटल्यास त्यावरही खोबरेल तेल खूप उपयोगी ठरते. फाटलेल्या टाचा वर खोबरेल तेल रोज रात्री झोपण्यापूर्वी लावावे. यामुळे तेथील डेड स्किन निघून जाण्यास, त्वचा मऊ मुलायम होण्यास मदत होते.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

कडुनिंबाचा रस –
फाटलेल्या टाचांवर कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून टाचेला लावणेही फायदेशीर ठरते.

हळद –
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे जखमा भरून येण्यास मदत होते. यासाठी हळदीमध्ये कोमट तेल टाकून मिश्रण तयार करून ते फाटलेल्या टाचांवर लावावे. हळदीचे अन्य आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या..

औषधी मलम –
फाटलेल्या टाचांवर औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावणेही फायदेशीर ठरते. त्यामुळे फाटलेली त्वचा मॉइश्चराइज होऊन डेड स्किन निघून जाते व त्वचा मऊसर होते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ धुवून त्याठिकाणी औषधी मलम किंवा मॉइस्चराइजर क्रीम लावावी.