गरोदरपणातील व्यायाम आणि योगासने :
गरोदर स्त्रीने रोज हलका व्यायाम करणे आवश्यक असते. जर आपणास गरोदरपणात काही आरोग्य समस्या नसल्यास प्रेग्नन्सीमध्येही आपण हलका व्यायाम करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करण्याचे खूप फायदे आहेत. विशेषतः यामुळे नॉर्मल प्रसुती (normal delivery) होण्यास मदत होत असते.
गर्भावस्थेत व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या :
गर्भावस्थेत गर्भवती महिलेने रोज हलका व्यायाम करणे चांगले असते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने परस्पर व्यायाम सुरू करू नका. तुमच्या डॉक्टरांनी जर तुम्हाला गरोदरपणी व्यायाम करण्यास सांगितले असल्यास त्यांच्या सल्ल्याने व्यायाम सुरू करा.
प्रेग्नन्सीमध्ये गरोदर स्त्रीने व्यायाम करताना अशी घ्यावी काळजी :
- गरोदर स्त्रीने हलका व्यायाम करणे अपेक्षित असते.
- व्यायाम करताना पोटावर ताण येता कामा नये.
- व्यायामात दुखापत होण्याची, घसरून पडण्याची शक्यता नसावी.
- व्यायाम करण्यापूर्वी तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्यावे. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
- जास्त थकवा आणणारा व्यायाम करू नये.
- अधिक वेळ व्यायाम करू नये.
- जड वस्तू उचलणे, दंडबैठक, पायऱ्या सारख्या चढणे उतरणे असले व्यायाम करू नयेत.
गरोदरपणात गर्भवतीने करावयाचे व्यायाम :
चालण्याचा व्यायाम –
गरोदरपणामध्ये चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत, बागेत किंवा घरात 10 ते 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करू शकता. तसेच इतरवेळी एकाजागी अधिकवेळ बसून न राहता घरात थोडे फिरत राहावे. चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील रक्तसंचारण योग्यप्रकारे होते. त्यामुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय गरोदरपणी चालण्याचा व्यायाम करण्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासही मदत होते.
स्ट्रेचिंग व्यायाम –
आरामकाळात बसलेल्या ठिकाणी पायांचा स्ट्रेचिंग व्यायाम करावा. यामध्ये पायाला हळूहळू ताण देण्याचा व्यायाम करावा. यामुळे पायातील रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन पायाच्या शिरा सुजत नाहीत, पायात गोळे येण्याची समस्याही कमी होते.
गरोदरपणातील योगासने –
प्रेग्नन्सीमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सोपी योगासनेही करू शकता. विशेषतः दीर्घ श्वसन जरूर करावे, त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. यासाठी बसलेल्या स्थितीत डोळे बंद करून श्वासावार लक्ष केंद्रित करावे व नाकाने अधिक श्वास घ्यावा व हळूहळू बाहेर सोडावा. असे अनेकदा करीत राहावे.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात कोणता आहार घ्यावा ते जाणून घ्या
Read Marathi language article about exercise during pregnancy. Last Medically Reviewed on February 17, 2024 By Dr. Satish Upalkar.