जेष्ठांचे आरोग्य :
वार्धक्य (म्हातारपण) ही प्रत्येक व्यक्तीमध्ये कालांतराणे सामान्यतः वयाच्या 60 ते 70 वर्षानंतर उत्पन्न होणारी एक सामान्य अवस्था असते. वृद्धावस्थेत शरीरातील बल धातू स्मृती यांचा क्षय झाल्याने वृद्ध व्यक्तीमध्ये अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये प्रामुख्याने हूद्यरोग,संधिवात>, मधुमेह, दुर्बलता, कॅन्सर, निद्रानाश, स्मृतिनाश, पक्षाघात, नेत्रविकार, मोतिबिंदू इ. हे विकार अधिकतेने आढळतात.
जेष्ठांचा आहार –
वय जसे वाढत जाते तसे आहाराची गरज कमी कमी होत जाते. आहारात फळे, पालेभाज्या, दूध, तांदूळ, गहू यांचा समावेश करावा. आहारातील साखर, मीठाचे प्रमाण कमी करावे. यामुळे अनुक्रमे मधुमेह आणि उच्च-रक्तदाब यासारखे विकार होण्यापासून दूर राहता येते.
वृद्धत्व आणि विहार –
- मोकळ्या हवेत सकाळी फिरावयास जावे.
- समवयस्कांमध्ये मिसळावे त्यांच्याशी गप्पा माराव्यात.
- आध्यात्म आणि निसर्गाच्या सानिध्यात जावे.
- कौटुंबिक वादविवादापासून अलिप्त रहावे.
- कोणावरही आपले मत लादू नये. वैचारिक मतभेदातून परिवारामध्ये खटके उडण्याची शक्यता असते. या वेळी आपण तटस्थ राहून मार्गदर्शकाची भुमीका पार पाडणे गरजेचे असते.
वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही काही देशाची गौरवाची गोष्ट नाही. व्यवहारीक जगामध्ये जेष्ठ नागरिकांकडे भुर्दंड म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे.