डोळ्यातून सतत पाणी येणे – Watery Eyes :
डोळे हे आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असून डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. डोळ्यात कचरा, धूळ जाणे, एखादी बाहेरील वस्तू (फॉरन बॉडी) डोळ्यात जाणे, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यांचा अतिवापर, डोळ्यातील जंतुसंसर्ग आणि अँलर्जी यांमुळे प्रामुख्याने डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या होऊ शकते.
डोळ्यातून सारखे पाणी येणे यावर घरगुती उपाय –
1) डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.
डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत. तसेच डोळ्यात सारखे पाणी येत असल्यास हाताने डोळे पुसू किंवा चोळू नयेत. यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. कारण त्यामुळे इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते.
2) काकडीचे काप करून ते डोळ्यावर ठेवावे.
डोळ्यातून सतत पाणी येत असल्यास फ्रीजमध्ये ठेवलेल्या काकडीचे काप करून ते डोळ्यावर काही वेळ ठेवावे. काकडी थंड गुणांची असल्याने यामुळे डोळ्यांना आराम मिळून डोळ्यातून पाणी येण्याची समस्या थांबते. अशाच प्रकारे गाजराचे कापही डोळ्यावर ठेऊ शकता.
3) गुलाबजल भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवावे.
डोळ्यातून सारखे पाणी येत असल्यास गुलाबजलात भिजवलेले कापसाचे बोळे डोळ्यावर काही वेळ ठेवावेत किंवा दोन थेंब गुलाबजल डोळ्यात घतल्यानेही ही समस्या दूर होण्यास मदत होते.
डोळ्यातून पाणी येत असल्यास घ्यायची काळजी –
अशावेळी हाताने डोळे पुसू किंवा चोळू नयेत. यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास तत्काळ हात धुऊन घ्यावे. कारण त्यामुळे इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता असते.
हे सुध्दा वाचा – डोळे येण्याची कारणे, लक्षणे व त्यावरील उपाय जाणुन घ्या..
Read Marathi language article about Watery Eyes problem causes and home remedies. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.