डोक्यात फोड येणे –

काहीवेळा आपल्या डोक्यात लहानमोठे फोड आलेले दिसतात. डोक्यात फोड येण्याची कारणे अनेक आहेत. इन्फेक्शनपासून ते एलर्जीपर्यंत अशी अनेक कारणे याला कारणीभूत असतात. येथे डोक्यात फोड येण्याची कारणे व उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी दिली आहे.

डोक्यात फोड येणे याची कारणे व उपाय याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे.

डोक्यात फोड का येतात ..?

अनेक कारणांनी डोक्यात फोड येऊ शकतात. डोक्यात फोड का व कशामुळे येतात हे फोडांच्या लक्षणांवरून कळू शकते. काही फोड लहान तर काही मोठे असतात, काही फोड दुखतात तर काही दुखत नाहीत. अशावेळी नेमके कसले फोड आहेत ते कसे ओळखावे याची माहिती खालील 5 विभागात दिली आहे.

1) डोक्यात लहान फोड येणे –

शितपित्त, केसातील कोंडा किंवा उवा यांमुळे डोक्यात लहान फोड येऊ शकतात.

2) डोक्यातील लहान व लालसर फोड –

डोक्यातील पिंपल्स, मुरूम यामुळे लालसर लहान फोड येतात. हे फोड सूज आलेले व खाज असणारे असतात.

3) पू येणारे डोक्यातील फोड –

फॉलिक्युलायटिस (folliculitis) ह्या समस्येमुळे डोक्यात पू येणारे फोड येतात.

4) डोक्यात मोठे फोड येणे –

pilar cysts ह्या समस्येमुळे डोक्यात मोठे व न दुखणारे फोड येतात.

5) डोक्यात फोड व खपली होणे –

सोरायसिस या त्वचा विकारामुळे डोक्यात खपली व फोड येत असतात.

डोक्यात फोड येणे याची कारणे –

डोक्यातील मुरूम, फॉलिक्युलायटिस, ऍलर्जी, डोक्यातील कोंडा, उवा,पिलर सिस्ट, स्कॅल्प सोरायसिस अशी विविध कारणे ही डोक्यात फोड येणे यासाठी जबाबदार असतात. याशिवाय काहीवेळा डोक्यात फोड हे त्वचेच्या कॅन्सरमुळेही येऊ शकतात.

डोक्यातील पिंपल्स (Scalp acne) –

चेहऱ्यावर जसे पिंपल्स किंवा मुरूम येतात तसेच ते डोक्यातही येत असतात. यामुळे मुरुमांचे फोड डोक्यात येतात. प्रामुख्याने बॅक्टेरिया, हार्मोन्समधील असंतुलन या कारणांनी मुरुमांचे फोड डोक्यात येतात. हे फोड लालसर लहान व सूज असलेले असतात. फोड आलेल्या ठिकाणी दुखते तसेच खाज येत असते. तसेच काही वेळा यातून रक्तही येऊ शकते. विशेषतः केस विंचरतना डोक्यातील मुरुमांना कंगवा लागल्याने किंवा मुरुमांच्या फोड नखांनी फोडल्याने, खाजवल्याने या फोडातून रक्त येऊ शकते.

डोक्यात मुरुमांचे फोड येणे यावर घरगुती उपाय –

  • डोक्यात आलेले मुरुमांचे फोड कमी करण्यासाठी केसांना तेल लावणे काही दिवस कमी करा.
  • केस रोजच्यारोज अँटीबॅक्टेरियल साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • हळदीचा लेप डोक्यातील मुरुमांच्या फोडांवर लावावा. यामुळे डोक्यातील मुरुमांचे फोड कमी होतात.
  • आल्याचा रस काढून तो डोक्यातील मुरुमांच्या फोडांवर लावावा. यामुळे डोक्यातील मुरुमांचे फोड कमी होतात.
  • डोक्यातील फोड नखांनी फोडणे किंवा खाजवणे टाळा.
  • आहारात हिरव्या पालेभाज्या फळभाज्या ताजी फळे यांचा समावेश करा.
  • तेलकट पदार्थ खाणे कमी करा.

फॉलिक्युलायटिस (Folliculitis) –

हेअर फॉलिकल खराब झाल्याने तेथे इन्फेक्शन होऊन फॉलिक्युलायटिस ही समस्या निर्माण होते. या त्रासात डोक्यात मुरुमांसारखे दिसणारे लाल फोड येऊ शकतात. आलेल्या फोडांमध्ये सूज व वेदना असते. ते फोड दुखत असतात. तसेच त्या फोडातून पू येत असतो. फॉलिक्युलायटिस वरील उपचारात आपले डॉक्टर अँटीबायोटिक औषधे व वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतील. तसेच ते अँटीबॅक्टेरियल शाम्पूचा वापर करण्यास सांगतील. घरगुती उपाय म्हणून या त्रासावर गरम शेक घेणे फायदेशीर असल्याचे दिसून येते.

ऍलर्जीमुळे डोक्यात येणारे फोड –

हेअर प्रोडक्ट, वातावरणातील बदल, प्रदूषण अशा अनेक गोष्टींच्या ऍलर्जीमुळे काहीवेळा डोक्यात फोड येऊ शकतात. तसेच शितपित्त सारख्या त्रासमध्येही विशिष्ट पदार्थाच्या ऍलर्जीमुळे त्वचेसह डोक्यातही लहान फोड येत असतात. अशावेळी डोक्यात आलेले फोड हे खाज व सूजयुक्त असतात.

हे सुद्धा वाचा – अंगावर पित्त उठणे यावरील उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कोंडा आणि उवा यांमुळे आलेले फोड –

डोक्यातील कोंडा आणि उवा यामुळेही काहीवेळा डोक्यात फोड येऊ शकतात. अशावेळी डोक्यातील कोंडा किंवा उवा कमी करण्यासाठी उपाय केल्यास डोक्यातील फोडसुध्दा कमी होतात.

हे सुद्धा वाचा – केसातील कोंडा दूर करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

हे सुद्धा वाचा – डोक्यातील उवा घालवण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

स्कॅल्प सोरायसिस (Scalp psoriasis) –

स्कॅल्प सोरायसिस हा सोरायसिस या त्वचा विकाराचा एक प्रकार आहे. यामध्ये डोक्यातील त्वचेमध्ये सोरायसिस होतो. यामध्ये डोक्यात काही ठिकाणी चांदी रंगाचा पातळ थर जमा होतो. त्यामध्ये खाज सुटते तसेच तेथे फोड येऊ शकतात. यावर सोरायसिसवरील उपचार करावे लागतात.

हे सुद्धा वाचा – सोरायसिस वरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पिलर सिस्ट (Pilar cysts) –

पिलर सिस्ट यामध्ये डोक्यात मोठेमोठे फोड येतात. हे फोड कॅन्सर संबंधित नसतात. त्यामुळे यात सहसा घाबरण्याचे कारण नाही. पिलर सिस्टमुळे डोक्यात आलेले फोड हे स्पर्श केलातरीही दुखत नाहीत. उपचारामध्ये ऑपरेशनद्वारे हे फोड काढून टाकले जाऊ शकतात.

निष्कर्ष – Conclusion :

अशाप्रकारे या लेखामध्ये डोक्यात फोड येणे याची कारणे व त्यावरील उपाय यांची माहिती दिलेली आहे. जर घरगुती उपाय करूनही डोक्यातील फोड कमी न होता त्यांची वाढ होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन त्याचे योग्य निदान करून घ्यावेत. कारण काहीवेळा डोक्यातील फोड हे त्वचेच्या कॅन्सर संबंधितही असू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता dermatologist डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान करणे आवश्यक आहे.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
6 Sources

In this article information about Bumps on scalp causes, symptoms, treatment and home remedies in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...