जिभेला चिरा पडणे – Tongue Cracks :
काहीवेळा जिभेवर चिरा पडत असतात. या त्रासाला ‘Fissured tongue’ या नावाने ओळखले जाते. जीभाच्या वरच्या भागावर तसेच जीभच्या कडावरही यामुळे क्रॅक पडत असतात.
जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी वेदना होतात. विशेषतः अन्न खाताना किंवा पिताना, गरम व मसालेदार पदार्थ जिभेला लागल्यास त्रास अधिक जाणवू लागतो. असे त्रास व लक्षणे यावेळी जाणवू लागतात.
जिभेला चिरा पडणे याची कारणे :
हा त्रास प्रामुख्याने आहारातील पोषकतत्वांची कमतरता, लोह व जीवनसत्वांचा अभाव, सोरायसिस किंवा काही औषधांचे साईड इफेक्ट्स यामुळे होत असतो. याशिवाय डाऊन सिंड्रोम, मेलकर्सन-रोझेन्थाल सिंड्रोम, चेहऱ्याचा अर्धांगवायू यासारख्या स्थितीमध्येही जिभेला चिरा पडत असतात.
जिभेला चिरा पडणे यावरील घरगुती उपाय :
बर्फ –
जिभेवर चिरा पडल्यास त्याठिकाणी बर्फ लावावा. यामुळे तेथील वेदना व जळजळ कमी होते. ह्या त्रासात दिवसभरात दोन ते तीन वेळा जिभेला बर्फ लावावा.
टूथपेस्ट –
टूथपेस्टमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जिभेवर चिरा पडलेल्या असल्यास त्याठिकाणी दररोज स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. अन्यथा त्या जखमांमध्ये बॅक्टेरिया किंवा बुरशी यांचे इन्फेक्शन होऊ शकते. यासाठी जिभेस चिरा पडल्यास दात घासताना जीभसुद्धा स्वच्छ करावी तसेच दिवसातून दोनदा जिभेवर टूथपेस्ट लावावी.
कडुनिंबाची पाने –
कडुनिंबाच्या पानात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जिभेला चिरा पडल्यास कडुनिंबाची 3 ते 4 पाने चावत राहावी. कडुनिंबाच्या पानांची पातळ पेस्टसुद्धा आपण जिभेवर लावू शकता.
कोरपडीचा गर –
जिभेवर क्रॅक पडल्यास त्याठिकाणी कोरपडीचा गर लावल्यास आराम पडतो. याशिवाय चिरांमुळे झालेल्या जखमाही लवकर बऱ्या होतात.
जिभेवर चिरा पडल्यास अशी घ्यावी काळजी :
- तोंडाची व जिभेची स्वच्छता ठेवावी.
- नियमित दात घासावेत.
- दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
- शरीरात लोहाची कमतरता असल्यास व त्यामुळे जिभेवर क्रॅक पडत असल्यास आहारात चिकन, अंडी, मांस, अळंबी यांचा समावेश करावा.
- काही दिवस जास्त तिखट, मसालेदार व खारट पदार्थ खाणे टाळावे.
- चहा, कॉफी पिणे टाळावे.
- तंबाखू, स्मोकिंग, अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे.
हे सुद्धा वाचा..
तोंड येण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Tongue Cracks Causes, Treatments and Home remedies. Last Medically Reviewed on February 22, 2024 By Dr. Satish Upalkar.