Dr Satish Upalkar’s article about Head Feel Heavy in Marathi.

डोके जड होणे :

काहीवेळा आपले डोके जड झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी डोक्याच्या ठिकाणी भारीपणा जाणवतो, डोक्याभोवती घट्ट बँड बांधल्यासारखे वाटते. त्याबरोबरचं डोकेदुखी, थकवा, मानदुखी, चक्कर येणे असे त्रासही होऊ शकतात. या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी डोके जड होण्याची कारणे, उपचार व त्यावरील घरगुती उपाय याविषयी माहिती सांगितली आहे.

डोके जड होण्याची कारणे :

डोके जड पडणे ही एक सामान्य समस्या असून याची अनेक कारणे असतात. डोकेदुखी, मायग्रेन किंवा सायनसचा त्रास यापासून ते अगदी मेंदूतील ट्यूमरसारख्या गंभीर स्थितीमध्येही डोके जड झाल्यासारखे वाटत असते. डोके जड होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

डोके जड पडणे यावरील उपचार – Head Feel Heavy treatment in Marathi :

रुग्णातील लक्षणे, मेडिकल हिस्ट्री व तपासणी करून यावर उपचार केले जातात. डोके जड होणे यावर आपले डॉक्टर वेदनाशामक औषधे देतील. जर मायग्रेन, सायनस समस्या किंवा थायरॉईड समस्या यामुळे डोके जड होत असल्यास मायग्रेन वैगरे समस्या दूर करण्यासाठी औषधे दिली जातात. अशक्तपणामुळे डोके जड होत असल्यास लोह व व्हिटॅमिन यासाठी सप्लिमेंट औषधे दिली जातील.

डोके जड होणे यावर हे करा घरगुती उपाय :

 • आल्याचा तुकडा चावून खावा.
 • काही लवंगा घेऊन त्या तव्यावर भाजून गरम कराव्यात. त्यानंतर एका रुमालात त्या गरम लवंगा घालून त्यांचा वास हुंगल्यास डोके जड झाल्याने होणारी डोकेदुखी कमी होते.
 • वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावावी.
 • आयुर्वेदिक अणू तेलाचे दोन थेंब नाकपुडीत घालावे. डोके जड पडणे यावर हे गुणकारी औषध आहे.
 • आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोके जड झाल्यास आराम मिळतो.

डोके जड होऊ नये यासाठी अशी घ्यावी काळजी :

 • संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा.
 • ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
 • दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
 • दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
 • मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
 • चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
 • स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
 • जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
 • नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
 • मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मन शांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
 • तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
 • ‎डोके जड होऊन डोके दुखत असल्यास वरचेवर वेदनाशामक औषधे घेणे टाळा.

डोके जड झाल्यास अशावेळी हॉस्पिटलमध्ये तात्काळ जावे :

 • जास्त प्रमाणात डोके जड वाटत असल्यास,
 • अतिशय डोकेदुखी असल्यास,
 • वेदनाशामक औषधे घेऊनही आराम न पडल्यास,
 • मळमळ व उलट्या होत असल्यास,
 • छातीत दुखत असल्यास,
 • डोळ्यांनी अस्पष्ट, धूसर दिसत असल्यास,
 • बोलण्यास त्रास होत असल्यास,
 • तोल जात असल्यास,
 • चालण्यास त्रास होत असल्यास, अशावेळी हॉस्पिटलमध्ये तात्काळ जाणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा..
अर्धे डोके दुखत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
3 Sources

In this article information about Head Feel Heavy Causes, Treatments and Home remedies in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...