बद्धकोष्ठता आणि आहार (Constipation Diet plan) –
पचनास जड असणारे पदार्थ खाणे, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मांसाहार, जंकफूड, फास्टफुड वारंवार खाणे. आहारातील हिरव्या पालेभाज्याचे प्रमाण कमी असणे यामुळे बद्धकोष्ठता होत असते. त्यामुळे पोट साफ न होण्याची तक्रार होऊ लागते. ही समस्या प्रामुख्याने आहारासंबधित असते. त्यामुळे पोट साफ होत नसल्यास योग्य आहार घेणे आवश्यक असते.
रोज पोट साफ होण्यासाठी काय खावे..?
नियमित पोट साफ होण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, फळभाज्या, मोड आलेली कडधान्ये, दूध, ताक, तूप यांचा समावेश करावा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये, फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून ते पोट साफ होण्यास मदत करते. दिवसभरात पाणीही पुरेसे प्यावे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
पोट साफ होत नसल्यास काय खाऊ नये..?
तळलेले पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मसालेदार पदार्थ, मांसाहार, हरबरा, मटार, बटाटा, कोबी इत्यादी पचनास जड असणारे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. यामुळे पोट साफ होत नाही, यामुळे अपचन व गॅसेसच्या तक्रारीही होतात. यासाठी असे पदार्थ सतत खाणे टाळावे.
हे सुद्धा वाचा – पोट साफ होण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Constipation diet plan. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.