गरोदरपणातील सर्दी व खोकला :
गरोदरपणात कोणताही साधा त्रास जरी झाला तरी त्याचा आपल्या गर्भाशयातील बाळावर काही परिणाम तर होणार नाही ना, याबद्द्ल थोडी भीती गर्भवती मातेला वाटत असते. मात्र गरोदर होण्यापूर्वी जसे सर्दी, खोकला वगैरे त्रास होतात तसेच ते गर्भावस्थेतही होत असतात. हे त्रास अगदी सामान्य असून ते फारसे गंभीर नसतात.
गरोदरपणात सर्दी किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?
प्रेग्नन्सीमध्ये सर्दी, खोकला याबरोबरच जर आपल्याला तीव्र ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, अंगदुखी किंवा थकवा अशी लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांकडे जावे. कारण ही लक्षणे फ्ल्यू संबंधित असू शकतात. याबरोबरच तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला राहल्याससुद्धा डॉक्टरांकडे जावे.
प्रेग्नन्सीमध्ये सर्दी, खोकला झाल्यास ही घ्यावी काळजी :
सर्दी किंवा खोकला यासाठी आपण जी नेहमी घेतो ती औषधे प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दी, खोकल्यासाठी कोणतेही औषध घेऊ नका.
सर्दी, खोकला असल्यास menthol rub चा वापर करू शकता. यासाठी menthol rub छातीला व नाकाजवळ लावावा. सर्दी, खोकला बरोबरच ताप असल्यास paracetamol औषध घ्यावे. गरोदरपणात तापासाठी aspirin किंवा ibuprofen अशी वेदनाशामक औषधे घेऊ नयेत.
गरोदरपणात सर्दी व खोकला होणे यावरील घरगुती उपाय :
- पुरेसे पाणी आणि तरल पदार्थ प्यावेत. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
- निलगिरी तेल गरम पाण्यात घालून त्याची वाफ घ्यावी.
- सर्दीबरोबर खोकला आणि घसादुखी असल्यास कोमट पाण्यात मध, आल्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण प्यावे.
- तुळशीची पाने व आले घातलेला चहा प्यावा.
- सर्दी, खोकल्यामुळे घशाला सूज आल्यास गरम दुधात हळद घालून पिणे उपयुक्त ठरते.
हे सुद्धा वाचा..
गरोदरपणात ताप आल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Cold and Cough during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.