गर्भावस्थेत गरोदर स्त्रीला ताप येण्याची कारणे व तापावरील उपाय जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गर्भावस्थेत ताप येणे :

गरोदरपणात अनेकदा ताप येऊ शकतो. ताप हा सर्दी, खोकला या किरकोळ समस्येबरोबर येऊ शकतो. तसेच काही वेळा ताप येणे हे गंभीर अशा आजाराचे लक्षण ही असू शकते. तापामध्ये 100.4 डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त temperature असते.

गरोदरपणात ताप आल्यास अशी घ्यावी काळजी :

गर्भावस्थेत ताप आल्यास पुरेसे पाणी प्यावे आणि आराम करावा. प्रेग्नन्सीमध्ये तापावरील कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदरपणात ताप आल्यास पॅरासिटामॉल हे औषध घेऊ शकता.

गर्भधारणेदरम्यान विशेषत: पहिल्या तीन महिन्यात aspirin आणि ibuprofen  हो औषधे तापसाठी किंवा अंगदुखीसाठी घेऊ नयेत.

प्रेग्नन्सीमध्ये ताप येण्याची कारणे :

ताप हा इतर अनेक आजारांचे लक्षणदेखील असू शकतो.
ताप हा सर्दी, खोकला या सामान्य त्रासामुळे होत असतो. तसेच काहीवेळा एखाद्या गंभीर आजारांमध्येही ताप येऊ शकतो. टायफॉइड, न्यूमोनिया, मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू, कावीळ अशा गंभीर आजारांमुळेही ताप येत असतो. याशिवाय गरोदर स्त्रियांमध्ये काहीवेळा गर्भजलाची पिशवी फुटल्यामुळेही ताप येऊ शकतो. त्यामुळे गरोदरपणात ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून कोणकोणता त्रास होत आहे ते सांगावे व उपचार घ्यावेत.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरोदरपणात ताप आल्यास डॉक्टरांकडे कधी जावे..?

जर आपला ताप पॅरासिटामॉल (paracetamol) हे औषध घेऊनही कमी न आल्यास आणि पोट दुखणे, अशक्तपणा जाणवणे, बाळाची हालचाल कमी झाल्यासारखी वाटत असल्यास आपल्या डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा.

ताप येऊ नये म्हणून गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी..?

गरोदरपणात बाहेरून आल्यावर हात, पाय स्वच्छ धुवावेत.
अस्वच्छ सार्वजनिक शौचालयात लघवीला जाणे टाळावे. तसेच आजारी लोकांना भेटायला जाणे टाळावे.

हे सुद्धा वाचा..

गरोदरपणात सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती देणारे उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.