नाक गच्च होणे (Stuffy nose) :
सर्दी झाल्याने नाक जाम किंवा गच्च होत असते. याला नाक चोंदणे असेही म्हणतात. वातावरणात बदल झाल्यामुळे, प्रामुख्याने थंडी आणि पावसाच्या दिवसात सर्वानाच सर्दी, खोकला आणि व्हायरल इंफेक्शनचा त्रास होत असतो. सर्दी किंवा पडशामुळे अनेकांना नाक चोंदण्याची समस्या होत असते.
सर्दीमुळे नाक बंद झाल्यास अगदी श्वास घेतानाही त्रास होत असतो. सर्दी लवकर जात नाही त्यामुळे या त्रासामुळे वैताग येत असतो.
सर्दीमुळे चोंदलेले नाक मोकळे करण्याचे घरगुती उपाय :
लिंबू रस आणि मध –
चमचाभर लिंबू रसात थोडे मध मिसळून मिश्रण रोज सकाळी प्यावे. यामुळे चोंदलेलं नाक मोकळं होण्यास मदत होते.
आले –
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही नाक मोकळे होण्यास मदत होते. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.
पुदिना –
गरम पाण्यात पुदिन्याची पाने टाकून त्याची वाफ घेण्यामुळेही सर्दीमुळे जाम झालेले नाक मोकळे होण्यास मदत होते.
कांदा –
कांदा घेऊन बारीक करीत राहावे. यामुळे डोळ्यातून आणि नाकातून पाणी वाहण्यास मदत होईल त्यामुळे नाक मोकळे होईल. त्याचप्रमाणे थोडे तिखट, मसालेदार जेवण खावे. यामुळेही नाकातून पाणी वाहून नाक मोकळे होईल.
गरम पाण्याची अंघोळ –
नाक चोंदने समस्या असल्यास गरम पाण्याने अंघोळ करा. यामुळे चोंदलेले नाक मोकळे होण्यास मदत होते व फ्रेशही वाटते.
Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 13, 2024.