कारले – Bitter gourd :
कारले कडू चवीची असल्याने अनेकांना आवडत नाहीत. मात्र कारले चवीला जरी कडवट असले तरीही आरोग्यासाठी मात्र खूपच उपयोगी असतात. कारल्यात अनेक आवश्यक पोषकघटक असतात. कारल्याला english मध्ये Bitter melon किंवा bitter gourd या नावाने ओळखले जाते. य
कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. त्यामुळे कारले भाजी खाणे हृदयासाठी चांगली असते. मधुमेहामध्येही कारले खाणे हितकर असते. तसेच त्वचा विकारांवर देखील कारले गुणकारी असते.
कारल्यातील पोषकतत्वे :
कारले हे प्रामुख्याने व्हिटॅमिन-C ने समृद्ध असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हाडांच्या आरोग्यासाठी आणि जखमा लवकर भरून येण्यासाठी व्हिटॅमिन-C चे महत्वाचे कार्य असते. याशिवाय कारल्यात भरपूर असणारे व्हिटॅमिन-A हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असते.
कारल्यात फायबर्स, फोलेट, पोटॅशियम, झिंक आणि आयर्न (लोह) यासारखी महत्वाची पोषकतत्वेही मुबलक प्रमाणात असतात. तसेच कारल्यात कॅटेचिन, गॅलिक ऍसिड, एपिकॅचिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड यासारखी महत्वाची अँटिऑक्सिडेंट असतात. ही अँटिऑक्सिडेंट आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात व कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.
कारले भाजी खाण्याचे फायदे :
1) रक्तातील साखर आटोक्यात ठेवते..
कारल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर कमी होते. तसेच टिश्यूजपर्यंत साखर पोहचवून नैसर्गिकरित्या इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होण्यासही यामुळे मदत होते. त्यामुळे मधुमेहामध्ये कारले उपयुक्त असते. यासाठी मधुमेही व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात कारल्याची भाजी जरूर समावेश करावी.
2) कॅन्सर होण्यापासून रक्षण करते..
कॅन्सरला अटकाव करणारे अनेक घटक कारल्यात असतात. कारल्यात असणाऱ्या कॅटेचिन, गॅलिक ऍसिड, एपिकॅचिन आणि क्लोरोजेनिक ऍसिड अशा महत्वाच्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. यासाठी कॅन्सरसारखा आजार टाळण्यासाठी कारल्याच्या भाजीचा आहारात जरूर समावेश असावा.
3) वाईट कोलेस्टेरॉल कमी करते..
वाईट कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात यासारखे गंभीर आजार होत असतात. कारल्याच्या नियमित सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल (म्हणजे LDL cholesterol) आणि triglycerides चे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
4) त्वचा विकारांवर उपयोगी..
कारल्यामुळे रक्तशोधन होऊन रक्तातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे ह्याचा उपयोग त्वचेच्या रोगांवर होतो. अंगाला सतत खाज येत असल्यास कारल्याचा आहारात समावेश असणे उपयुक्त ठरते.
5) पोट साफ होण्यास मदत होते..
कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. यातील फायबर्समुळे नियमित पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठताचा त्रास असल्यास कारल्याची भाजी खावी.
6) डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारी..
कारल्यात व्हिटॅमिन-A आणि beta-carotene विपुल प्रमाणात असल्याने ह्याचा उपयोग आपली दृष्टी सुधारण्यास होतो.
चांगल्या आरोग्यासाठी कारल्याची भाजी अशी करावी :
अनेकठिकाणी कारल्याची भाजी करताना कडूरस मीठ लावून पिळून काढून टाकला जातो. ही पद्धत चुकीची असून यामुळे कारल्यातील सत्व निघून जाते. त्यामुळे कारल्याची अशाप्रकारे भाजी करून खाणे टाळावे.
कारले खाण्याचे फायदे व नुकसान याची माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर भेट द्या..
कारले खाण्यामुळे होणारे नुकसान व तोटे :
कारल्यात अनेक पोषकतत्वे असली तरीही योग्य प्रमाणात कारले खाणे आवश्यक असते. अधिक प्रमाणात कारले खाल्यास पोटात दुखणे, अतिसार, उलट्या होणे हे त्रास होऊ शकतात. पोटदुखी, उलट्या असे त्रास होऊ शकत असल्याने गरोदरपणात कारले खाण्यामुळे त्रास होऊ शकतो. यासाठी गरोदर असल्यास कारली खाणे टाळावे.
तसेच अधिक प्रमाणात कारले खाण्यामुळे एकाएकी रक्तातील साखर कमी होऊ शकते. यासाठी डायबेटीस रुग्णांनी कारल्याचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कारल्यातील पोषकघटक (Nutrition Facts) :
एक कप कारल्यात पुढीलप्रमाणे पोषकघटक असतात.
- कॅलरी – 20
- कर्बोदके – 4 ग्रॅम
- फायबर – 2 ग्रॅम
- व्हिटॅमिन C – 93% RDI
- व्हिटॅमिन A – 44% RDI
- फोलेट – 17% RDI
- पोटॅशियम – 8% RDI
- जिंक – 5% RDI
- लोह – 4% RDI
हे सुद्धा वाचा..
दुधी भोपळा खाण्याचे फायदे जाणून घ्या..
Read Marathi language article about Bitter gourd health benefits and side effects. Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.