Dr Satish Upalkar’s article about Foods to Avoid During Pregnancy in Marathi.
गर्भावस्थेत काय खाणे टाळले पाहिजे..?
गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण आईने घेतलेल्या आहाराचा परिणाम हा पोटातील बाळाच्या आरोग्यावरही होत असतो. यासाठी या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी गर्भावस्थेत कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजेत याविषयी माहिती सांगितली आहे.
गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने हे पदार्थ खाऊ नये :
चरबीचे पदार्थ –
तळलेले पदार्थ, फॅट्स (चरबीयुक्त पदार्थ), विविध प्रकारच्या मिठाई, बेकरी पदार्थ, जंकफूड, फास्टफूड, हवाबंद पदार्थांपासून प्रेग्नन्सीमध्ये दूर रहावे. कारण अशा पदार्थांच्यामुळे गर्भावस्थेत हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा, पोट साफ न होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच वरील पदार्थात कोणतेही पोषक घटक नसतात त्यामुळे गर्भावस्थेत वरील पदार्थ खाऊ नयेत.
खारट पदार्थ –
गर्भावस्थेत खारट पदार्थ अधिक खाल्यास हातापायांवर व पोटावर सूज येते, रक्तदाब वाढतो तर बाळाच्या किडनीच्या विकासावर विपरीत परिणामही होऊ शकतो. त्यामुळे गर्भावस्थेत आहारातून जास्त खारट पदार्थ, लोणची, पापड, चिप्स किंवा स्नॅक्स खाणे टाळावे. गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब समस्या व त्याचे परिणाम जाणून घ्या..
गोड पदार्थ –
गर्भावस्थेत गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे. गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास प्रेग्नन्सीमध्ये मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. गर्भावस्थेतील मधुमेहाचा वाईट परिणाम तुमच्या तसेच बाळाच्याही आरोग्यावर होऊ शकतो. गर्भावस्थेतील मधुमेहाविषयी अधिक जाणून घ्या..
दूषित पदार्थ –
बाहेरचे उघड्यावरील दूषित पदार्थ, शिळे अन्न खाणे टाळावे. फळे, भाज्या यावर हानिकारक केमिकल, कीटकनाशके फवारलेली असतात. त्यामुळे फळे, भाज्या स्वच्छ धुतल्याशिवाय खाऊ नयेत. बाहेरचे पाणीही पिणे टाळावे. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असतो. गर्भावस्थेत फिल्टरचे पाणी किंवा उकळवून गार केलेले पाणी प्यावे. बाहेर पाणी पिऊ नये.
कच्चे मांस –
गर्भावस्थेत कच्चे मांस किंवा अर्धवट शिजलेले मांस खाणे टाळावे. गर्भवती महिलांनी कच्ची अंडीही खाणे टाळले पाहिजे.
कॅफेन व सोडायुक्त पेये –
गर्भावस्थेत वारंवार चहा, कॉफी पिणे टाळावे. यात कॅफेनचे प्रमाण अधिक असते. तसेच सोडायुक्त कोल्ड्रिंक्स पिणेही टाळले पाहिजे. तसेच सिगारेट, तंबाखू, मद्यपान अशी व्यसनेही करू नयेत.
हे सुध्दा वाचा – गर्भावस्थेत काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या..
In this article information about Which food avoid and not eat During pregnancy in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).