बाळाची वाढ आणि विकास –

प्रत्येक महिन्यात आपल्या बाळाची वाढ व विकास कसा होत असतो याची माहिती खाली दिली आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळ नवनवीन कृती शिकत असते.

1 महिने –
बाळ पहिल्या महिन्यात हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्याकडे पाहते, आईला ओळखते. मूठ घट्ट आवळून घेऊ शकते. मोठ्या आवाजाने दचकते.

2 महिने –
या महिन्यात बाळ नजर स्थिर ठेऊ शकते. बाळ हसते, ओळखीची माणसे पाहून हसणे. बाळाला पाठीवर झोपवले असता ते आपली मान बाजूला हलविते.

3 महिने –
बाळाला पालथे झोपविल्यास ते आपली मान व खांदे उचलते. आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देते. बाळाला बोलाविल्यास आनंदाने हुकार देते, हसते.

4 महिने –
खेळणी पकडण्यासाठी हात पुढे करत असते. आवाजाकडे लक्ष दते.

प्रेग्नन्सी पुस्तक डाऊनलोड करा..
'प्रेग्नन्सी मराठी' ह्या पुस्तकात प्रेग्नन्सी, डिलिव्हरी पासून ते बाळाच्या काळजीपर्यंत सर्व माहिती दिली आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

5 महिने –
बाळाची मान धरते. मानेचा तोल सावरता येतो.  हातावर ताबा येतो. खेळणी अधिक आवडू लागतात. यावेळी वजन हे जन्म वजनाच्या दुप्पट होते. एकसारखे आवाज काढते, ओरडते.

6 महिने –
बाळाला पालथे झोपवल्यास ते पलटी होऊ शकते. बाळाचे दात येण्यास सुरवात होते. आवाज अधिक निघू लागतात.

7 महिने –
या महिन्यात बाळ आधाराने बसू लागते. बाळ खेळणी उचलून हलविते व फेकू शकते. त्याचे नाव घेतल्यास प्रतीसाद देते. बाळ एकेक अक्षर बोलू लागते.

8 महिने –
या महिन्यात बाळ आधाराशिवाय बसू शकते व रांगण्याचा प्रयत्न करते. एका हातातून दुसऱ्या हातात खेळणे घेते. खेळणी तोंडात घालते. आपण बोललेली अक्षरे ते स्वतः बोलण्याचा प्रयत्न करते.

9 महिने –
बाळ रांगायला लागते. खेळण्यांची आवड दाखवणे. खेळणी हातात घेऊन त्याकडे पाहते. अक्षरे जोडून बोलू लागते. बाबा, काका, मामा, टाटा, दादा असे शब्द बोलू लागते.

10 महिने –
आधाराने उभे राहते. आनंदाने टाळ्या वाजविते. टाटा करणे, छोटी वाक्ये त्याला समजू लागतात.

11 महिने –
बसल्यावर आधाराशिवाय उठून उभे राहते व आधाराने पावले टाकते. खेळणी किंवा वस्तू पकडते, खेळण्यात रमते.

12 महिने –
बाळ उठून उभे राहते व दुसऱ्यांचा हात धरून हळूहळू पावले टाकते. बाळाचे सहा दात येतात. त्याला आपण बोललेले समजू लागते. जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन यावेळी होते.

13 महिने –
बाळ उठून उभे राहते व आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करते. वस्तू उचलून घेते. छोटे शब्द बोलू लागते.

14 महिने –
आधाराशिवाय चालू लागते. पायऱ्या रांगत चढू लागते. अनेक छोटे छोटे शब्द बोलू लागते.

15 ते 17 महिने –
बाळ घरात खूप चालत राहते. त्याचे 10 ते 12 दात येतात. खेळणी पाहिजे असतात. शब्दांची सारखी बडबड चालू असते.

18 ते 24 महिने –
न धडपडता घरात खूप चालत असते, पळू लागते. खुर्चीवर बसू शकते. चेंडू फेकू शकते. ग्लासने दूध किंवा पाणी पिऊ शकते. शब्दांची सारखी बडबड चालू असते.

2 वर्षे –
पायऱ्या चढू उतरू शकते. न पडता पळत असते, उड्या मारते. चेंडू फेकून खेळू शकते. स्वतःच्या हाताने खाऊ खाते. त्याला हवे ते मागत असते. पेन्सिलने वहिवर रेषा मारते, रंगीत चित्रे पाहण्यात दंग होते . लघवीला आल्याचे सांगते. वाक्ये बोलू लागते. आजूबाजूच्या वस्तूंची नावे सांगते.

3 वर्षे –
स्वत: कपडे घालते. दिवसभर खेळ चालूच असतो. घराच्या बाहेर खेळू लागते. बरो नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागते.

4 वर्षे –
खूपच समजू लागते. सारखे खेळायला आवडते. बरोबरीच्या मुलांमध्ये रमते. तीनचाकी सायकल चालवू लागते. वहीत चित्रे रंगवण्याचा, अक्षरे काढण्याचा प्रयत्न करते.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

बाळाच्या वाढीचे टप्पे आणि आहार :

बाळाची प्रत्येक महिन्यात वाढ होत असताना विविध टप्प्यावर बाळाचा आहार कसा असला पाहिजे याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आहे. 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. करा.