
बारा महिन्यांचे बाळ :
बाळाच्या जन्मापासूनच ते बाळ थोडे मोठे होईपर्यंत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याठिकाणी बारा महिन्याच्या बाळाची घ्यावयाची काळजी याची सविस्तर माहिती दिली आहे.
बारा महिन्याच्या बाळाचे वजन आणि उंची :
प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास वेगवेगळा असतो.
बालकाचे (baby boy) चे वजन 7.8 ते 11.8 किलो आणि उंची 80 सेमी पर्यंत इतकी असू शकते.
तर बालिकेचे (baby girl) चे वजन साधारण वजन 7.1 ते 11.3 किलो असते आणि उंची सुमारे 75 सेमी पर्यंत असू शकते.
बारा महिन्यांच्या बाळातील विकासाचे टप्पे :
• बाळ आधाराशिवाय उठून उभे राहते.
• दुसऱ्यांचा हात धरून हळूहळू पावले टाकते.
• बाळाचे सहा दात येतात.
• त्याला आपण बोललेले समजू लागते.
• जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन यावेळी होते.
बारा महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा :
या वयातील बाळांसाठी दिवसातून दोन ते तीनवेळा स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. याबरोबरचं दिवसातून चार ते पाच वेळा ठोस आहार बाळास भरवावा. डाळ भात वरण, भाजी, चपाती, फळे, दुधाचे पदार्थ, मऊ मांस, मासे, अंडे यांचा समावेश आहारात असावा.
• मऊ शिरा, उपमा, साबुदाणा खिचडी किंवा तांदूळ वा नाचणीची खीर भरवावी.
• दहीभात किंवा तूप घालून वरणभात, डाळभात भरवावी.
• गाजर, भोपळा, बटाटा, मटार, रताळे, सफरचंद यासारख्या भाज्या किंवा फळे चांगल्याप्रकारे उकडून, मऊ लगदा करून बाळास भरवावा.
• केळे, आंबा, टरबूज, सीताफळ, चिक्कू या फळांचा गर भरवावा.
• चांगले शिजलेले मांस, मासे यातील हाडे काढून मऊ भाग बाळाला भरवू शकता.
बारा महिन्याच्या बाळाची झोप :
बारा महिन्याचे बाळ साधारण 10 ते 12 तास झोप घेत असते. बाळाची वाढ आणि विकासासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते.
बाराव्या महिन्यात बाळाच्या विकासासाठी हे करा :
• बाळाच्या हाताला धरून त्याला चालण्यास मदत करावी.
• अंघोळ घालण्यापूर्वी बाळाला मालिश करावी.
• बाळाला रंगीबेरंगी खेळणी आणून द्यावीत.
• बाळाबरोबर खेळण्यांनी खेळावे.
• पुस्तकातील रंगीत चित्रे दाखवावी.
• बाळाला झोपवताना छान छान अंगाई गीते म्हणावीत.
डॉक्टरांकडे कधी जावे..?
बाळाला ताप, अतिसार, उलट्या, सर्दी, खोकला असे त्रास झाल्यास बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)
हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी मराठीत उपाय (Heart care tips in Marathi)