बाळाचे रांगणे (Baby Crawling) :
आपले बाळ चालण्यास, फिरण्यास शिकण्यासाठी रांगण्याचे बाळाच्या विकासामध्ये खूप महत्व असते. रांगण्यासाठी बाळ आपल्या हात व गुडघ्यांचा वापर करीत असते.
बाळ कधी गुडघ्यावर रांगते..?
बाळ सहा ते नऊ महिने वयाच्या दरम्यान रांगायला शिकू शकते. सहा ते सात महिन्यात बाळाच्या मांसपेशी मजबूत झालेल्या असतात. अशावेळी बाळास जमिनीवर पोटावर झोपवल्यास सुरवातीला हाताच्या साहाय्याने पुढे पुढे सरकू लागतात. याला कमांडो क्रॉलिंग असेही म्हणतात.
त्यानंतर आठ ते दहा महिन्यात ते कोणत्याही आधाराशिवाय बसायला शिकते. थोड्या दिवसात बाळ बसलेल्या स्थितीतूनच हात, पाठ आणि गुडघ्यांच्या साहाय्याने हळूहळू रांगायला सुरवात करतात. बाळ एक वर्षाचे झाल्यावर योग्यप्रकारे रांगू लागते. रांगत रांगत ते सर्व घरभर फिरत असते.
बाळाला रांगायला कशी मदत करावी..?
तिसऱ्या चौथ्या महिन्यात बाळाला काहीवेळ पोटावर झोपवावे. त्याच्यासमोर रंगीबेरंगी खेळणी ठेवावीत. त्यामुळे ते डोके हळूहळू वर करण्याचा प्रयत्न करते. छाती व डोके वर करण्यासाठी ते आपल्या बाहूंचाही वापर करू लागते. अशाप्रकारे बाळाचे पाठ, मान, हात आणि पायाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे हळूहळू बाळ डोके वर करणे, पालथी होणे याबरोबरच बसण्यासही शिकत असते. यातूनच पुढे ते रांगायला शिकत असते.
बाळ रांगायला लागल्यावर काय काळजी घ्यावी..?
• पलंगावर बाळाला एकटे सोडून जाऊ नये. बाळ रांगत जाऊन कॉटवरून खाली पडण्याची शक्यता असते.
• फारशी स्वच्छ राहिल याची काळजी घ्यावी.
• फरशीवर कात्री, पिना, सूरी, मोळे अशा धारदार वस्तू पडलेल्या नसाव्यात.
• औषधे गोळ्या, डासांचे कॉईल, अगरबत्ती अशा विषारी वस्तूही फरशीवर पडलेल्या नसाव्यात.
• घरासमोर पायऱ्या असल्यास बाळ रांगत जाऊन पायऱ्यांवरून पडणार नाही याची काळजी घ्यावी.
बाळ रांगायला शिकल्यावर पुढे काय शिकते..?
एकदा का बाळ योग्यप्रकारे रांगायला शिकल्यास पुढे कशाचाही आधार घेऊन हळूहळू उभे राहायला शिकत असते. बाळ उभे राहायला कधी शिकते ते जाणून घ्या..
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
In this article information about When do babies Crawl in Marathi language.
प्रेग्नेंसी, डिलिव्हरी आणि बालसंगोपन विषयक मराठी pdf पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी खालील फॉर्मद्वारे संपर्क साधा. Pdf मोफत पुस्तक WhatsApp Number वर पाठवण्यात येईल.