लहान बाळाला ताप येणे :
बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने त्याला वरचेवर ताप, सर्दी, खोकला असे त्रास होत असतात. जेंव्हा शरीराचे तापमान हे 100 डिग्री फारेनहाइटपेक्षा अधिक असते तेंव्हा ताप येत असतो.
सामान्यतः वातावरणातील बदल, इन्फेक्शन, लसीकरण, सर्दी खोकला किंवा जुलाबमुळेही बाळांना ताप येऊ शकतो.
बाळास ताप आल्यास अशी घ्यावी काळजी :
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापावरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. बाळाला तापाचा अधिक त्रास होत असल्यास त्याला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे.
तापामुळे बाळामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला दूध द्यावे. 6 महिन्यापेक्षा अधिक वयाचे बाळ असल्यास त्याला वरचेवर तरल पदार्थ, दूध, ओआरएस मिश्रण द्यावे.
बाळाला ताप आल्यास हे उपाय करावे :
- बाळाला ताप असल्यास घाबरून जाऊ नका.
- बाळाच्या अंगावरील सर्व कपडे काढा.
- खिडक्या बंद ठेवू नका. घरात पुरेशी खेळती हवा असावी.
- ताप उतरण्यासाठी ओल्या टॉवेलने अंग पुसून काढा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामोल सिरप ( उदा. कॅलपोल इ) योग्य डोसनुसार देऊ शकता. या उपायांनी ताप तात्पुरता उतरतो.
- मात्र हे उपाय करूनही ताप येत राहिल्यास डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.
हे सुध्दा वाचा..
Read Marathi language article about Baby fever treatment. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.