केस पांढरे होण्याची समस्या आणि आयुर्वेदिक उपाय :

वेळेपूर्वी केस पांढरे होण्याची समस्या आज अगदी सामान्य झाली आहे. विशेषतः अनुवांशिक कारणे, मेलेनिनची कमतरता, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असतात. आयुर्वेदानुसार चुकीचा आहार घेण्यामुळे म्हणजे जास्त खारट, आंबट पदार्थ खाण्यामुळे केस लवकर पांढरे होत असल्याचे सांगितले आहे.

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत आयुर्वेदिक उपाय..

आवळा –
आयुर्वेदात आवळ्याला असाधारण महत्त्व आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर आवळा खूपच गुणकारी ठरतो. आवळ्याच्या पावडरमध्ये लिंबू रस पिळून ते केसांवर लावल्याने पांढरे झालेले केस काळे होतात. तसेच आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.

कडीपत्ता –
खोबरेल तेलात कडीपत्ताची काही पाने घालून तेल उकळून घ्यावे. तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा. पांढरे केस काळे होण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरतो.

भृंगराज –
भृंगराज ह्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

काळी मिरी –
दह्यामध्ये काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण केसांवर लावल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

Read Marathi language article about Ayurvedic home remedies for white hair. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.