गुणकारी कोहळा :
कोहळा या फळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदानेही कोहाळ्याला खूप गुणकारी मानले आहे. आयुर्वेदानुसार कोहळा हा शीत, स्निग्ध गुणांचा असून वात-पित्त कमी करणारा, बुद्धीवर्धक आणि बल वाढवणारा आहे.
कोहळाचा आहारातील वापरामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य, पचनशक्ती , मानसिक आरोग्य, बद्धकोष्ठता, लठ्ठपणा अशा विविध समस्यांवर कोहळा गुणकारी असतो.
कोहळा औषधी उपयोग :
• कोहळा खाण्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
• ऍसिडिटी होत असल्यास कोहळा रसात थोडी हिंग घालून ते दिवसातून दोन वेळा घ्यावे.
• नाकातून रक्तस्त्राव होत असल्यास कोहाळ्याचा रस सेवन करावा.
• मळमळ, उलट्या व डोकेदुखी होत असल्यास चार चमचे कोहळ्याचा रसात साखर मिसळून मिश्रण घ्यावे.
• मुळव्याध असल्यास कोहळ्याचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरते.
• मुतखडा असल्यास किंवा लघवीला जळजळ होत असल्यास कोहाळ्याचा रस प्यावा.
• प्रजनन क्षमता कमी असणाऱ्या पुरुषांसाठी कोहळा खाणे फायदेशीर असते.
• फिट येत असल्यास 1 चमचा गाईचे तूप, 9 चमचा ज्येष्टमध चूर्ण, 9 चमचा कोहाळा रस हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे.
• मुलांची बुद्धी व स्मरणशक्ती वाढण्यासाठीही कोहळ्याचा उपयोग होतो.
Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.