पाय लचकणे – Ankle Sprain :
काहीवेळा चालताना, खेळताना किंवा पळताना अचानक पायात लचक भरते. यामुळे पायाच्या घोट्यामध्ये दुखू लागते, तेथे सुजही येत असते. पाय लचकला असल्यास चालताना अधिक त्रास होऊ लागतो.
पाय लचकणे यावर घरगुती उपाय –
1) पाय लचकला असल्यास तेथे बर्फाने शेक द्यावा ..
पायात लचक आली असल्यास तेथे बर्फाने शेक दिल्याने सूज व वेदना कमी होऊन आराम वाटतो. यासाठी बर्फाचे तुकडे कापडात बांधून लचक आलेल्या ठिकाणी त्याचा शेक द्यावा. ह्या त्रासात दिवसातून दोन ते तीन वेळा बर्फाने शेक द्यावा. पाय लचकणे यावर हा घरगुती उपाय उपयुक्त आहे.
2) पायात लचक भरल्यास तेथे बँडेज बांधावे ..
पाय लचकला असल्यास तेथे कापडाचे बँडेज बांधावे. यामुळे त्या भागातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. मात्र जास्त घट्ट आवळून कापडी पट्टी बांधू नये. यासाठीचे इलास्टिक बँडेज मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळते. त्याचा आपण वापर करू शकता. तसेच ankle brace सुध्दा मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असते. पायात लचक आली असल्यास घोट्याला आधार देण्यासाठी ब्रेसचा वापर करू शकता.
3) लचक आलेल्या ठिकाणी वेदनाशामक क्रीम लावा ..
पाय लचकला असल्यास तेथे वेदनाशामक जेल लावू शकता किंवा वेदनाशामक स्प्रेचा वापर करू शकता. यामुळे तेथील सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच लचकलेले मांसपेशीही यामुळे शिथिल होतात. यासाठी Moov, Volini, Fast relief, Iodex, VICCO Narayani अशा अनेक pain relief creams आणि Spray उपलब्ध आहेत.
4) पायात लचक भरल्यास तेथे हळद लावा ..
हळदीत आयुर्वेदिक वेदनाशामक गुणधर्म असतात. यामुळे पाय लचकला असल्यास तेथे हळदीचा लेप लावावा. यामुळे पायाच्या घोट्यातील सूज व वेदना कमी होऊन आराम वाटतो.
5) पायात लचक आल्यास तेथे चुना आणि पाणी एकत्र करून लावा ..
पाय लचकला असल्यास तेथे चुना आणि पाणी एकत्र करून लावल्यास सूज व वेदना कमी होण्यास मदत होते. पाय लचकणे यावर हा घरगुती उपाय आपण करू शकता.
6) पायात लचक भरल्यास तेथे कोमट तेलाने मालीश करा ..
खोबरेल तेलात लसूण घालून ते तेल कोमट करून घ्यावे. या तेलाने लचक आलेल्या ठिकाणी हलकी मालिश करावी. यामुळेही तेथील दुखणे आणि सूज कमी होते व आराम मिळतो. तसेच पायात लचक भरणे यावर आपण आयुर्वेदिक वेदनाशामक तेलांचा वापरही करू शकता. यासाठी निर्गुंडी तेल, महानारायण तेल मेडिकल स्टोअर्स मध्ये उपलब्ध असते.
पायात लचक भरणे यावरील उपचार –
पायात लचक भरल्यास पायाच्या घोट्याजवळ सूज येते. तसेच तेथे वेदनाही होत असतात. यासाठी पायात लचक भरणे यावर आपले डॉक्टर ibuprofen किंवा acetaminophen यासारखी वेदनाशामक गोळ्या औषधे देतील. तसेच ते दुखणाऱ्या भागी लावण्यासाठी वेदनाशामक जेल किंवा स्प्रे ही देऊ शकतात.
पायात लचक भरू नये यासाठी घ्यायची काळजी –
- चालताना पायात लक्ष असावे.
- उंच टाचेच्या चपला वापरणे टाळावे.
- आपल्या पायाच्या योग्य मापाच्या चपला वापराव्यात.
- व्यायाम करण्यापूर्वी वार्मअप जरूर करावा.
अशी काळजी घेतल्यास पायात लचक भरत नाही.
हे सुध्दा वाचा → पायात गोळा येणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Ankle Sprain Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.