गर्भावस्थेतील अंगदुखी (Body pain during pregnancy) :
गरोदरपणात अंग दुखणे हे तसे सामान्य असते. बहुतांश स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखी होण्याची तक्रार असते. गरोदरपणात हार्मोनल बदलामुळे थकवा येत असतो त्यामुळे थोडेजरी काम केले तरी अंगदुखी होत असते.
गरोदरपणात अंग दुखत असल्यास करायचे उपाय :
1) विश्रांती घ्यावी.
प्रेग्नन्सीमध्ये अंगदुखत असल्यास थोडावेळ आराम करावा. दुखणाऱ्या ठिकाणी आयुर्वेदिक वेदनाहर औषधांनी मालीश करावी.
2) जास्त कष्टाची कामे करणे टाळा.
गरोदरपणात जास्त कष्टाची कामे करू नयेत. यामुळे अंगदुखी होऊ शकते. यासाठी जड वस्तू उचलणे, जास्त श्रमाची कामे करणे टाळावे.
3) दररोज थोडा व हलका व्यायाम करावा.
गरोदरपणात डॉक्टरांनी सांगितलेला हलका व्यायाम नियमित करावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालण्याचा व्यायाम करावा. अधिकवेळ एकचठिकाणी बसणे किंवा उभे राहणे टाळावे.
प्रेग्नन्सीमध्ये अंग दुखत असल्यास गोळ्या औषधे खावीत का..?
अंगदुखीसाठी वेदना कमी करणारी अनेक औषधे ही गरोदरपणात घेणे सुरक्षित नसतात. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी कोणतीही वेदनाशामक औषधे अंगदुखीवर खाऊ नयेत.
अंग अधिक दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित वेदनाशामक औषध घ्यावे. paracetamol या औषधाचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता. मात्र aspirin किंवा ibuprofen असणारी वेदनाशामक औषधे वापरू नयेत.
Read Marathi language article about Whole body pain during pregnancy. Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.