कोथिंबीर आणि किडनी स्टोन :
किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. बदललेली जीवनशैली, चुकीचे खानपान या सर्वांचा आपल्या किडनीवर परिणाम होत असतो. त्यामुळेच अनेकजण मुतखडा किंवा किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहेत. अशावेळी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुतखडावर नानाविध उपाय करीत असतात. मात्र असे करणे धोकादायक ठरू शकते.
काही लोक सोशल मीडियावरील मेसेज वाचून मुतखडा पडण्यासाठी कोथिंबिरीचा रस पितात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा कोणताही उपाय करू नये. कारण कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. अधिक प्रमाणात पोटॅशियम शरीरात गेल्यास ते शरीरासाठी नुकसानदायक ठरण्याची शक्यता असते.
कोथिंबीर खाणे आरोग्यासाठी हे फायदेशीर असते. मुतखडा असल्यास आहारात कोथिंबीरचा जरूर समावेश करा. मात्र मुतखडा पडावा यासाठी कोथिंबीरचा रस करून तो अधिक प्रमाणात पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आपल्या रक्तामध्ये पोटॅशियमचे प्रमाण 3.5 ते 5.0 mEq/L इतके असावे लागते. जेव्हा शरीरात पोटॅशियमचे प्रमाण अधिक वाढते तेव्हा त्याला हायपरक्लेमिया असे म्हणतात. हायपरक्लेमियामुळे विविध हृदयविकार होऊ शकतात, तसेच हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मुतखडावर उपाय म्हणून कोथिंबीरचा रस पिणे टाळावे.
मुतखड्यावरील उपचाराविषयी माहिती
Read Marathi language article about Coriander leaves juice and kidney stones. Last Medically Reviewed on February 28, 2024 By Dr. Satish Upalkar.