केसातील उवा आणि लिखा (Head Lice) :
केसांची स्वच्छता, देखभाल योग्य प्रकारे न ठेवल्यास केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. केसात उवा होणे ही यापैकीचं एक समस्या आहे. केसातील उवा ह्या परजीवी असून त्या आपल्या केसांमधील टाळूतील रक्त पित असतात. ऊवा झाल्यामुळे डोक्यामध्ये खाज येते. त्यामुळे उवा असल्यास त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.
केसांत उवा होण्याची कारणे :
केसांची स्वच्छता न ठेवल्याने केसांत उवा होत असतात. याशिवाय केसात उवा असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याशी संपर्क आल्याने, त्याचा कंगवा किंवा त्याने वापरलेली टोपी, टॉवेल, उशी यांच्या संपर्कात आल्याने एकमेकांच्या केसात मिसळतात.
केसातील उवा जाण्यासाठी हे करा घरगुती उपाय :
खोबरेल तेल आणि कापूर –
केसांमध्ये उवा किंवा लिखा असल्यास खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळांशी लावावे.
कांद्याचा रस –
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते. त्यामुळे डोक्यात उवा असल्यास कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावावे. यामुळे केसातील उवा पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते.
सीताफळाच्या बिया –
सीताफळाच्या बिया अगदी बारीक कुटून खोबरेल तेलात मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. केसातील उवा खात्रीशीरपणे नष्ट होतात. हा उवांच्या समस्येवर हा आयुर्वेदिक उपाय रामबाण उपाय आहे.
कडुनिंब –
कडुनिंब अँटी-बॅक्टरीयल गुणांचे असते. केसात उवा होण्याची समस्या असल्यास कडुनिंबाची पाने पाण्यात घालून चांगली उकळावीत. हे पाणी थंड झाल्यावर आपल्या केसांना लावावे. यामुळे डोक्यातील उवा आणि लिखा नष्ट होण्यास मदत होते.
लिंबू रस –
केसात उवा असल्यास केसांच्या मुळाशी लिंबू रस लावावा. यामुळेही उवा नष्ट होण्यास मदत होते.
केसातील उवांसाठी हे आहे औषध :
केसात उवा किंवा लिखा झाल्यास आपण लाइसिल ऑइल (Licel Oil) किंवा उवानाशक Medikar ऑइल, शाम्पू अशी औषधे वापर करू शकता.
केसात कोंडा होत असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
Read Marathi language article about Head Lice problem solution. Last Medically Reviewed on February 19, 2024 By Dr. Satish Upalkar.