मैमोग्राफी तपासणी (Mammography) :
स्तन कॅन्सरचे निदान करण्यासाठी मैमोग्राफीद्वारे स्क्रीनिंग परिक्षण केले जाते. तसेच चाचणीवेळी कोणताही त्रास होत नाही. या चाचणीतून उपस्थित गाठ ही कॅन्सरची आहे की नाही याचे निदान होण्यास मदत होते.
मैमोग्राफी तपासणीसाठी किती वेळ लागतो?
क्ष-किरण परिक्षणासारखेच मैमोग्राफीचे चाचणी असून 30 मिनिटामध्ये तपासणी पूर्ण होते.
मैमोग्राफी तपासणी कधी करून घ्यावी?
वेळोवेळी स्तनांमध्ये गाठ नसल्याची खात्री करुन घेणे गरजेचे असते. यासाठी वयाच्या 35शी नंतर दरवर्षी नियमित मैमोग्राफी चाचणी करुन घ्यावी. याद्वारे स्तन कॅन्सरचे निदान होण्यास मदत होते. स्तन कॅन्सरची माहिती जाणून घ्या..
स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. 35 वर्षांवरील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करणं आवश्यक आहे. मात्र अनेकजणी पुरेशा माहिती अभावी ही चाचणी करणे टाळतात.
Read Marathi language article about breast cancer related Mammography Diagnostic examination. Last Medically reviewed on 09 February 2024 by Dr Satish Upalkar.