पुरुषांतील वंध्यत्व समस्या :
गर्भधारणा होण्यास असमर्थता असणे, मुलबाळ न होणे म्हणजे वंध्यत्व समस्या. वंध्यत्वाच्या कारणांपैकी 30% कारणे ही पुरुषांसंबधी असतात. तर 30% वंध्यत्व कारणे हे स्त्रीसंबंधी असतात आणि उर्वरित 40% कारणे ही दोहोंसंबंधी असतात. (मात्र समाज वंध्यत्वासाठी संपुर्णतः स्त्रीलाच जबाबदार धरत असतो!)
पुरुषासंबधी वंध्यत्वाची कारणे :
पुरुषांमधील वंध्यत्व समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे विविध रोगांमुळे वंध्यत्व येऊ शकते, जन्मजात जनन अवयवातील विकृतीमुळे, वीर्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवते.
खालिल रोगांच्या उपद्रवातून वंध्यत्वता निर्माण होत असल्याचे प्रामुख्याने आढळते,
- मधुमेह विकार,
- लठ्ठपणा,
- नाडीसंबधी (Nervous system) आजारांमुळे,
- Immune system संबंधित आजारांमुळे,
- यकृताचे विकार,
- ऍनिमिया,
- किडनीचे विकार,
- गालफुगी आजार(Mumps),
- पौरुषग्रंथीला सूज येणे (Prostatitis),
- हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.
- जन्मजात जनन अवयवातील विकृतीमुळे वंध्यत्व समस्या उद्भवू शकतात.
- वृषणांवर आघात झाल्याने,
- जन्मजात Hypogonadism (वृषणांचा विकास न झाल्याने),
- Undesaended testicle (वृषण अंडकोषामध्ये न उतरल्यामुळे),
- Down syndrome,
- Testicular torsion (वृषणांचा रक्तपुरवटा खंडीत होणे) यासारख्या जनन अवयवातील विकृती उद्भवल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वता निर्माण होते.
अन्य सहाय्यक कारणे :
- आहारतील फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे,
- व्यायामाच्या अतिरेकामुळे,
- उष्ण ठिकाणी अधिक काळापर्यंत काम केल्यामुळे,
- अतिगरम पाण्याच्या स्नानाने. विशेषता Hot baths, Hot tubs मध्ये स्नान केल्याने,
- Steroids, Cemetidine, Phenytoin यासारख्या औषधांच्या अतिवापरामुळे,
- किमोथेरपी, रेडिएशन यांच्या दुष्परिणामामुळे,
- तसेच मोबाईलचा अतिवापर आणि जास्त टाईट पँट्स घालण्याच्या सवयीमुळे प्रामुख्याने पुरुषांमध्ये वंध्यत्व समस्या उत्पन्न होतात.
वंध्यत्व समस्या होऊ नयेत यासाठी पुरुषांनी अशी घ्यावी काळजी :
- संतुलित व पोषकतत्व युक्त आहाराचे सेवन करावे.
- आहारात दूध व दुधाचे पदार्थ, मांस, अंडी, सुकामेवा यांचा आवर्जून समावेश असावा.
- फॉलीक एसीडचा आहारात समावेश असावा.
- मधुमेह, लठ्ठपणा होऊ नये यासाठी चरबीचे पदार्थ, फास्टफूड, जंकफूड खाणे टाळावे तसेच नियमित व्यायाम करावा.
- व्यायामाचा अतिरेक टाळावा.
- अधिक गरम ठिकाणी जास्त वेळ राहू नये.
- हॉट बाथ टाळावा.
- जास्त टाईट अंडरवेअर घालणे टाळावे.
- वेश्या, अनैतिक संबध टाळावेत. लैंगिक रोगातून वंध्यत्वासंबधी समस्या अधिक प्रमाणात होतात.
- जनन अवयवसंबंधी रोग उद्भवल्यास त्वरीच तज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत.
हे सुद्धा वाचा..
महिलांमधील वंध्यत्व समस्या जाणून घ्या.
Read Marathi language article about Male infertility.