हिरड्या दुखणे (Gums pain) :
बऱ्याचवेळा आपल्या हिरड्या दुखू लागतात. याची अनेक कारणे असू शकतात. जसे हिरड्या सुजल्यास किंवा हिरड्यांना जखम झाल्यास हिरड्या दुखत असतात. अशावेळी ब्रश करताना आणि अन्न चावताना त्रास अधिक होत असतो.
हिरड्या दुखणे यावरील घरगुती उपाय –
मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात..
हिरड्या दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होऊन हिरड्या दुखणे थांबते.
लवंग दाढेत धरून ठेवावी..
हिरड्या दुखत असल्यास दाढेत लवंग धरून ठेवावी. लवंगमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे हिरड्यातील इन्फेक्शन रोखण्यास मदत होते. तसेच लवंगमुळे हिरड्यांमध्ये होणारी वेदना देखील कमी होते.
आल्याची पेस्ट दुखणाऱ्या हिरड्यांवर लावावी..
आले पेस्ट मध्ये मीठ मिसळून ती पेस्ट दुखणाऱ्या हिरड्यांवर लावावी. दहा मिनिटांनी चूळ भरून तोंड धुवावे. यामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होऊन वेदना दूर होतात. आल्यात सूज कमी करणारे अँटीइंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. हिरड्या दुखीवर हा उपाय चांगला आहे.
दुखणाऱ्या हिरड्यांवर बेकिंग सोडा लावावा..
हिरड्या दुखत असल्यास तेथे बेकिंग सोडा लावून चोळावे. यामुळे हिरड्यांची सूज व वेदना कमी होते.
दुखणाऱ्या हिरड्यांवर कोरपड गर लावावा..
हिरड्या दुखत असल्यास तेथे कोरपडाचा गर लावावा. कोरपड ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेट्री गुणांची असल्याने हिरड्यांची सूज व वेदना कमी करते.
दुखणाऱ्या हिरड्यांवर हळदीचा लेप लावा..
मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून त्याचा लेप दुखनाऱ्या हिरड्यांवर लावावा. हळदीत सूज व वेदना कमी करणारे गुणधर्म असल्याने हिरड्या दुखणे थांबते.
हिरड्या दुखत असल्यास होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता.
हिरड्यांची घ्यायची काळजी –
- तोंडाची स्वच्छता ठेवा.
- नियमित दात घासावेत.
- दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
- घरगुती उपायांनी हिरड्या दुखणे कमी न झाल्यास डेटींस्टकडे जावे.
हे सुध्दा वाचा – हिरड्या सुजणे यावरील उपाय जाणून घ्या..
Read Marathi language article about gums pain Home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 24, 2024.