अयोग्य खानपान, प्रखर ऊन, धूळ, प्रदूषण, केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधने, हार्मोनल असंतुलन, वृद्धत्व अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडत असते.
चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय करावे –
- ऑलिव्ह ऑईलने चेहऱ्याला मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्यात टॉवेल भिजवून त्याने चेहरा पुसून घ्यावा. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उजळून निघते.
- कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून अर्ध्या तासाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळेही तुमच्या चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होईल.
- रात्री झोपण्यापूर्वी हळद आणि चंदनाचा लेप चेहऱ्याला लावावा.
- पपईचा गर चेहऱ्यावर चोळावा. थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे तुमच्या चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा उजळून निघेल.
- चेहऱ्याला मसूर डाळीची पेस्ट लावून हलका मसाज करावा. दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. या घरगुती उपायाने काळपटपणा निघून जाऊन चेहरा उजळण्यास मदत होते.
हे सुध्दा वाचा – चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून जाणून घ्या.
Read Marathi language article about Face brightening tips. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.