कपाळ काळे पडणे – Black forehead :
अनेक कारणांनी कपाळ काळे पडते. कपाळ काळे पडल्याने सौंदर्य बाधित होऊन चेहराही खराब दिसू लागतो. याला वैद्यकीय भाषेत Melasma असे म्हणतात.
कपाळ काळे पडण्याची कारणे –
प्रामुख्याने त्वचेतील मेलॅनीनच्या जास्त स्त्रावामुळे कपाळ काळे पडते. तसेच शरीरातील काही पोषकघटक आणि व्हिटॅमिनची कमतरता, अनुवंशिकता, अपुरी झोप आणि वाढते वय ह्यामुळेही कपाळ काळे पडू शकते. याशिवाय कपाळ काळवंडण्यामागे खालील कारणे जबाबदार असू शकतात.
- हार्मोनमधील असंतुलन,
- बर्थ कंट्रोल गोळ्यांचा वापर, गर्भावस्था,
- थायरॉईड प्रॉब्लेम,
- सतत जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे कपाळाची त्वचा काळवंडते.
- कपाळावर जखम झाल्यामुळे किंवा भाजल्यामुळे त्याठिकाणची त्वचा काळे पडू शकते.
- हवेतील प्रदूषणामुळेही कपाळाची त्वचा काळवंडते.
कपाळ काळे पडणे यावर उपाय –
- कपाळ काळे पडल्यास तेथे रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचा लेप लावावा. हळदीतील आयुर्वेदिक गुणधर्मामुळे त्वचेचा काळवंडपणा निघून जातो.
- लिंबाच्या रसात मध मिसळून ते मिश्रण काळे पडलेल्या कपाळावर लावावे.
- कच्च्या बटाट्याचे काप घेऊन ते काळे पडलेल्या कपाळावर चोळावे.
- कापसाचा बोळा गुलाब जलात भिजवून त्याने कपाळ स्वच्छ करावे.
- उन्हात बाहेर फिरताना चेहऱ्यासह कपाळालाही सनस्क्रीन लावावी.
हे घरगुती उपाय कपाळ काळे पडणे यावर खूप उपयुक्त ठरतात.
कपाळ काळे पडू नये यासाठी घ्यायची काळजी –
- बाहेरून आल्यावर पाण्याने चेहरा व कपाळ धुवून स्वच्छ करावा.
- चेहरा व कपाळासाठी केमिकल्सयुक्त क्रीम वापरणे टाळावे.
- रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढूनच झोपावे.
- उन्हात बाहेर फिरताना चेहऱ्यासह कपाळालाही सनस्क्रीन लावा किंवा छत्री, टोपी यांचा वापर करा.
- दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते व काळी पडत नाही.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे, सुखामेवा यांचा समावेश असावा.
- वारंवार फास्टफूड, जंकफूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.
हे सुध्दा वाचा – चेहरा काळा पडणे यावरील उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Dark forehead causes and home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.