पॅप टेस्ट म्हणजे काय..?:
पॅप टेस्टमुळे सर्वायकल कँसरचे निदान होण्यास मदत होते. सर्वायकल कँसर (गर्भाशय मुखाचा कर्करोग) हा स्त्रियांमधील सर्विक्स ह्या भागात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा भाग. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणाऱ्या सर्वायकल कँसरचे निदान पॅप टेस्टमुळे केले जाते.
पॅप टेस्टसाठी गर्भाशय मुखाच्या पेशीचा एक भाग काढला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला जातो. यामुळे गर्भाशय मुखाच्या पेशीमध्ये झालेले अस्वाभाविक बदल यामुळे दिसून येतात आणि भविष्यात गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्वायकल कँसर होण्याची शक्यता आहे की नाही हे कळण्यास यामुळे मदत होते. सर्वायकल कँसरला प्रतिबंध करण्यासाठी महिलांनी पॅप टेस्ट नियमित करणे गरजेचे आहे. सर्वायकल कँसरची माहिती जाणून घ्या..
पॅप टेस्टसाठी वेळ किती लागतो..?
गर्भाशय मुखातील पेशी टेस्टसाठी गोळा करण्यासाठी केवळ 5 ते 15 मिनिटे लागू शकतात. गोळा केलेले सॅम्पल तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जाते. टेस्टच्या वेळी कोणताही त्रास होत नाही तसेच ऍडमिट होण्याचीही गरज नसते.
कोणी व कधी करावी पॅप टेस्ट :
इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे. स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या कॅन्सरच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो. त्यामुळे वयाच्या 21-65 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने 3 वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.
Read Marathi language article about Cervical cancer related PAP test. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on February 14, 2024.