उलटीतून रक्त पडणे :
अनेक कारणांनी उलटीतून रक्त पडू शकते. काही कारणे ही किरकोळ तर काही कारणे गंभीरही असू शकतात. त्यामुळे उलटीतून रक्त पडत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
उलटीत रक्त पडण्याची कारणे :
• पचनसंस्थेतील आजार जसे, अल्सर, ऍसिडिटी, गॅस्ट्रो, जठराला सूज येणे, स्वादुपिंडाला सूज येणे, अन्नातून विषबाधा होणे यामुळे उलटीतून रक्त पडू शकते.
• हिपॅटायटीस, यकृत निकामी होणे, यकृताचा कँसर किंवा लिव्हर सिरोसिस अशा यकृताच्या आजारांमुळेही उलटीतून रक्त जाऊ शकते.
• एस्पिरिन किंवा इतर वेदनाशामक औषधांच्या दुष्परिणामामुळे उलटीत रक्त पडू शकते.
• उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक अशा हृदयविकारामध्येही उलटीतून रक्त पडू शकते.
• अधिक प्रमाणात दारू पिण्यामुळे उलटीतून रक्त पडते.
• अन्ननलिका कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कर्करोग, यकृताचा कँसर यामुळेही उलटीतून रक्त पडत असते.
उलटीतून जास्त प्रमाणात रक्त जाणे, चक्कर व अशक्तपणा येणे, अंधुक दिसणे, बेशुद्ध पडणे, पोटात दुखणे, संडासमधून रक्त पडणे अशी लक्षणे असल्यास तात्काळ रुग्णाला दवाखान्यात दाखल करावे. दवाखाना जवळ नसल्यास 108 ह्या क्रमांकावर डायल करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी व रुग्णाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे.
दवाखान्यात उलटीतून रक्त कशामुळे जात आहे याचे निदान करण्यासाठी विविध निदान तपासण्या करण्यात येतील. यामध्ये ब्लड टेस्ट, एंडोस्कोपी तपासणी, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा एक्स-रे यांचा वापर करावा लागू शकतो.
Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.