बाळंतपणानंतर लैंगिक संबंध (Sex after delivery) :
डिलिव्हरी झाल्यावर किती दिवसांनी संबंध ठेवावे असा अनेकजणांचा प्रश्न असतो. मात्र प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. जसे प्रसुती कोणत्या प्रकारची झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी की सिझेरियन झाली आहे, डिलिव्हरीमध्ये टाके पडले आहेत का, अशा अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचाही सल्ला घेणेही आवश्यक असू शकते.
नॉर्मल डिलिव्हरी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवावे..?
डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यापर्यंत योनीतुन रक्तस्राव येत असतो. हा रक्तस्त्राव थांबल्यानंतर तुम्ही सेक्स सुरू करू शकता. जर रक्तस्राव थांबण्यापूर्वीचं लैंगिक संबंध सुरू केल्यास गर्भाशयातील जखमांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास व फार काही त्रास न झाल्यास प्रसूतीनंतर साधारणपणे सहा आठवड्यानंतर लैंगिक संबंध चालू करू शकता.
सिझेरियन डिलिव्हरी नंतर संबंध कधी ठेवावे..?
सिझेरियन ऑपरेशन झाले असल्यास पोटावरील टाक्यांची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे सिझेरियन डिलिव्हरी झाल्यास दीड ते दोन महिन्यानंतर संबंध ठेवावेत.
डिलिव्हरीमध्ये योनीभागात टाके पडल्यास कधी सेक्स सुरू करू शकतो..?
जर नॉर्मल डिलिव्हरी होताना योनी आणि गुदाच्या ठिकाणी जखम झाल्यास किंवा तेथे चिरा द्यावा लागलेला असल्यास व योनीभागात टाके पडलेले असल्यास जास्त काळजी घेणे आवश्यक असते. त्याठिकाणी अतिशय वेदना होत असतात. पुरेशी काळजी न घेतल्यास जखम वाढण्याची व तेथे जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे अशावेळी बळांतपणानंतर दीड ते दोन महिन्यानंतरच लैंगिक संबंध सुरू करावेत.
हे सुद्धा लक्षात घ्या..
याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे त्या स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी विचारात घ्यावी. कारण नुकतीच तीने गरोदरपणाच्या अवघड अवस्थेतून प्रसुतीच्या कळा सहन करून बाळाला जन्म दिलेला असतो. प्रसूतीनंतर आपल्या शरीराची तसेच बाळाचे स्तनपान व बालसंगोपनाची काळजी तिला घ्यावी लागत असते. अशावेळी स्त्रीची शारीरिक आणि मानसिक तयारी विचारात घेणे आवश्यक असते.
तसेच प्रसूतीनंतर 6 आठवड्यानंतर किंवा दीड – दोन महिन्यांनी सेक्स करताना गर्भनिरोधक साधनांचा (कंडोम वैगरे) वापर करावा. कारण नुकतीच स्त्री गरोदर व प्रसुता झालेली असते. त्यामुळे स्त्रीच्या शारीरिक स्थितीचा विचार करून पुन्हा लगेच गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करावा.
हे सुद्धा वाचा..
डिलिव्हरी नंतर वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या.
Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.