संडासच्या जागी फोड येणे –
संडासच्या जागी काहीवेळा फोड येतो. फोड आलेल्या ठिकाणी सूज येऊन दुखू लागते. तसेच या फोडात पू देखील धरू शकतो.
संडासच्या जागी फोड कशामुळे येतो..?
- गुदभागातील जखम, इन्फेक्शन तसेच गुदभागातील गळू (abscess) यामुळे संडासच्या जागी फोड येऊ शकतो.
- मधुमेह, क्रोहन डिसिज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, जुलाब व अतिसार यामुळेही संडासच्या जागी फोड येऊ शकतात.
- संसर्गजन्य लैंगिक आजारामुळेही संडासच्या जागी फोड येऊ शकतात.
संडासच्या जागी फोड आल्यास होणारे त्रास –
- संडासच्या जागी फोड आल्यास तेथे दुखू लागते. संडासच्या वेळी यामुळे जास्त त्रास होतो.
- फोडामध्ये सूज येऊन खाज सुटू शकते.
- संडासच्या जागी आलेले फोड फुटून तेथे इन्फेक्शन व जखम होऊ शकते.
डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक आहे..?
फोडातून पू येत असल्यास किंवा तेथे अधिक दुखत असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे. तसेच मधुमेह असल्यास संडासच्या जागी फोड आल्यास डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
संडासच्या जागी फोड येणे यावर उपाय –
संडासच्या जागी फोड आल्यास गरम पाण्यात जंतुनाशक औषध घालून त्या पाण्यात काही वेळ बसावे.
संडासच्या जागी फोड आल्यास तेथे अँटीबायोटिक क्रीम लावावी.
मलाचा खडा झाल्याने शौचावेळी फोड दुखत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे.
हे सुध्दा वाचा – संडास जागी खाज सुटण्याची कारणे व उपचार जाणून घ्या..
Read Marathi language article about Boil near the Anus causes and Home remedies. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.