मुळव्याध समस्या (Piles) :
चुकीचा आहार खाणे, वेळीअवेळी जेवण करणे, बैठे काम, उगीचच मलप्रवृत्तीवेळी जास्त वेळ बसून राहणे, वारंवार कुंथून जोर करणे, तिखट व मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करणे, पचायला जड पदार्थांचे वारंवार सेवन करणे यासारख्या अनेक कारणांमुळे मूळव्याधीचा त्रास सुरू होतो.
मूळव्याधमध्ये गुद्वारापाशी कोंब येऊन त्याठिकाणी सूज व वेदना होत असतात. तर काही वेळा शौचावाटे रक्तही पडत असते. भयंकर पीडा देणाऱ्या ह्या त्रासामुळे अनेकजण त्रासलेले असतात. अशावेळी ते नानाविध उपाय करून पाहतात. ह्याठिकाणी मूळव्याध वरील एक गुणकारी असा रामबाण उपाय सांगितला आहे.
मूळव्याधवर हा आहे रामबाण उपाय :
एरंडाची दोन पाने थोडे मीठ घातलेल्या कोमट पाण्यातून स्वच्छ धुवावीत. त्यानंतर ती पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात अर्धा कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. स्वच्छ फडक्याच्या साहाय्याने मिश्रण गाळून घ्यावे. हा तयार केलेला रस सलग चार दिवस सकाळी उपाशीपोटी घ्यावा. मूळव्याधच्या त्रासाला हे एक गुणकारी असे रामबाण औषध आहे. यामुळे आपली पाईल्सची समस्या लवकर दूर होण्यास मदत होईल.
मूळव्याध विषयी माहिती जाणून घ्या.
Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.