नखे काळी पडणे (Black Fingernail) –
बऱ्याच कारणांनी नखे काळी पडू शकतात. नखाला झालेली दुखापत किंवा नखांमध्ये बुरशीचा संसर्ग झाल्याने फंगल इंफेक्शनमुळे नखे काळी पडत असतात.
नखे काळी का पडतात..?
नखाला जोराचा मार लागल्यास नखाला दुखापत झाल्याने नखे काळी पडतात. तसेच फंगल इंफेक्शनमुळे देखील नखे काळी पडतात. याशिवाय काहीवेळा Melanoma प्रकारच्या स्किन कॅन्सरमुळेही नखे काळी पडू शकतात. त्यामुळे जर नखे काळी पडलेली असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
दुखापतीमुळे नखे काळी पडल्यास काय करावे..?
नखाला दुखापत झाल्याने ते काळे पडते. कारण दुखापतीमुळे नखाच्या आत रक्त जमा झाल्याने नख काळे पडत असते. अशावेळी नखात जमा झालेले रक्त काढून टाकणे गरजेचे असते.
कारण ते गोठलेले रक्त हे रक्तवाहिन्यांत जावून त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक अशा गंभीर समस्या होऊ शकतात. यासाठी नखाला मार लागल्याने नखात रक्त जमा झालेले असल्यास डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.
तसेच दुखापतीमुळे मुळातून तुटलेल्या नखाच्या जागी काही दिवसात नवीन नख येत असते.
हे सुध्दा वाचा –
नखांवर पांढरे डाग पडण्याची कारणे व उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Black Fingernail Causes and Treatments. Last Medically Reviewed on March 6, 2024 By Dr. Satish Upalkar.