मुतखड्याचा त्रास अनेकांना सतावत असतो. यामुळे पोटापासून ते पाठीपर्यंत अतिशय वेदना होत असतात. जर मुतखडा लहान आकाराचा असल्यास तो कोणत्याही त्रासाशिवाय लघवीवाटे बाहेर पडू शकतात.
मात्र मध्यम किंवा मोठ्या आकाराचे मुतखडे सहजासहजी बाहेर पडत नाहीत. ते मूत्रप्रणालीत अडकून बसल्यामुळे लघवी खाली जाण्यासाठी अडचणी निर्माण होते. त्यामुळे अशावेळी ओटीपोटापासून ते कंबरेपर्यंत असह्य वेदना होतात. यासाठी येथे मुतखडा सहजरित्या विरघळून, लघवीवाटे आपोआप बाहेर पडण्यासाठीच्या उपायांची माहिती दिली आहे.
मुतखडा आपोआप पडण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय :
लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल –
ग्लासभर पाण्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळून हे मिश्रण प्यावे. मुतखडा लघवीवाटे बाहेर निघण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर आहे.
पानफुटी –
पानफुटीची दोन पानं सकाळी चावून खाण्यामुळे मुतखडा बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर पडण्यास खूप मदत होते.
डाळिंबाचा रस –
डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक लघवीतून बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळे डाळिंबाचा रस पिणे किंवा डाळींबाचे दाणे खाणे मुतखडा लघवीवाटे बाहेर पडून जाण्यासाठी उपयोगी असते.
तुळस –
तुळशीच्या पानांचा रस मधाबरोबर दररोज घेतल्यास काही दिवसात मुतखडा पडण्यास मदत होते. तसेच यासाठी तुळशीची ताजी पानेही आपण चावून खाऊ शकता.
कुळथाचं कढण –
मुतखडा असल्यास आहारात कुळथाचं कढण किंवा हुलगे जरूर समाविष्ट करावे. कुळीथाचे कढण पिण्यामुळे मुतखडे बारीक होऊन पडून जातो.
कांद्याचा रस –
दररोज सकाळी अनशापोटी कांदा किसून त्याचा चमचाभर रस नियमित सेवन केल्यास मूतखड्याचे बारीक कण होऊन ते लघवीवाटे निघून जातात.
Last Medically Reviewed on February 23, 2024 By Dr. Satish Upalkar.