स्त्री वंध्यत्व – Female Infertility :
गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. एकटी स्त्री किंवा एकटा पुरुष कधीही गर्भधारण करु शकत नाही. मात्र प्रजनन अक्षमतेचे खापर समाजामध्ये पुर्णपणे स्त्रीवरचं नेहमी फोडले जाते आणि अशा स्त्रीस ‘वांझ’ म्हणुन हिनवून तिची अवहेलना केली जाते.
वंध्यत्व कारक घटक :
वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.
स्त्रीयांमधील वंध्यत्वाचे प्रकार :
प्राथमिक वंध्यत्व (Primary infertility) आणि द्वितियक वंध्यत्व (Secondary infertility) असे वंध्यत्वाचे दोन प्रकार आहेत.
1) प्राथमिक वंध्यत्व – यामध्ये स्त्रीस कधीही गर्भधारणा झालेली नसते.
2) द्वितीयक वंध्यत्व – या प्रकारात स्त्रीस गर्भधारणा झाल्यानंतर पुन्हा गर्भधारणा होत नसते.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे (Causes) :
- स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
- पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (PCOS) समस्या असणे,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- pelvic inflammatory disease (PID) मुळे,
- एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्स) यासारख्या आजारांमुळे,
- स्त्रीचे वय अधिक असणे,
- स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
- हायपोथायरॉडिजमची समस्या,
- सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
- मानसिक तणाव,
- कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
- लैंगिक आजार,
- किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
- वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
- गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.
स्त्री-संबधी वंध्यत्वाचे निदान कसे करतात..? :
स्त्री वंध्यत्व समस्येचे निदान तपासणी करताना डॉक्टर सुरवातीला मेडिकल हिस्ट्री पाहतील. त्यावेळी ते आपल्या आरोग्यविषयी काही माहिती विचारतील. त्यानंतर शारीरिक तपासणी व जनन अवयवांची तपासणी करण्यात येईल. याशिवाय खालील तापसण्यांही काहीवेळा करण्यात येतील.
- सोनोग्राफी – सोनोग्राफी तपासणी करून गर्भाशय आणि ओव्हरीजची स्थिती तपासली जाते.
- लॅप्रोस्कोपी – यामध्ये विशिष्ट कॅमेऱ्याद्वारे जनन अवयवाच्या आतील स्थिती तपासली जाते. ही तपासणी स्त्रीवंध्यत्वाचे नेमके कारण शोधण्यासाठी खूप महत्त्वाची असते.
- क्युरेटिंग – क्युरेटिंग करून गर्भाशयाच्या आतील स्त्राव घेऊन त्यामधील स्त्रीबाजाची स्थिती तपासली जाते.
- हिस्टोरोस्लपोग्राफी – ह्या एक प्रकारच्या X-ray द्वारे गर्भाशय व fallopian tubes ची स्थिती तपासतात.
- हार्मोन टेस्ट – याद्वारे FSH हार्मोनचे प्रमाण तपासले जाते.
वयाच्या तिशीनंतर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडून वर्षातून एकदा तपासणी करून घ्यावी व त्यांच्या सल्याने उपचार चालू करावेत. तसेच जर वयाच्या 35 शीनंतरही गर्भधारणा होत नसल्यास आपल्या डॉक्टरांकडून सहा महिन्यातून एकदा तपासणी करून घ्यावी व त्यांच्या सल्याने उपचार चालू करावेत.
स्त्री वंध्यत्व निवारण उपचार :
स्त्री वंध्यत्व तपासणीतून नेमके कारण स्पष्ट झाल्यावर सर्जरी, औषधोपचार किंवा वंध्यत्व निवारण IVF, IUI कृत्रिम गर्भधारणा पद्धती याद्वारे उपचार केले जातात. सर्जरीद्वारे गर्भशयाचा आकार योग्य करतात, गर्भाशयात गाठी असल्यास सर्जरीने त्या गाठी काढून टाकतात तसेच fallopian tubes मध्ये अडथळा असल्यास तो सर्जरीने दूर करतात. हार्मोन्समध्ये असंतुलन असल्यास औषधोपचारांचा वापर केला जातो.
हे सुद्धा वाचा –पुरुषांत वंध्यत्व समस्या होण्याची कारणे व उपचार
Read Marathi language article about Female Infertility Causes, Diagnosis, Treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.