पुरुषांना फिट आणि निरोगी राहण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स

7705
views

Fitness tips for Men in Marathi, health tips for men in Marathi, Men’s Health in Marathi.

शारीरिक फिटनेसमुळे शरीर आणि मन निरोगी रहाण्यास मदत होते. नियमित व्यायाम केल्याने केवळ स्नायूचं (Muscles) मजबूत होत नाही तर रोग प्रतिकार शक्तीही वाढते, वेगवेगळे रोग होण्यापासून बचाव होतो, म्हातारपण उशिरा येते म्हणूनच पुरुषांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खालील गोष्टींचे पालन केले पाहिजे.

आजच्या आधुनिक आणि आरामशीर बैठ्या जीवनशैलीमुळे पुरुषांना वयाच्या 20 वर्षांमध्येच हृदयरोगाचा धोका निर्माण झाला आहे.
जे लोक आरामी जीवन जगतात, व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात, तेलकट आणि चारबीजन्य आहार भरपूर प्रमाणात खात असतात त्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. त्यांच्यात बॅड कोलेस्टरॉलची (LDL) पातळी वाढलेली असते. परिणामी हृदयविकार, धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब, पक्षाघात, मधुमेह, कँसर, अर्थराइटिस यासारखे गंभीर विकारांना ते बळी पडतात.

नियमित व्यायाम करा :
• दररोज किमान तीस मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा. विविध योगासने, सायकलिंग करणे, पोहणे, जॉगिंगला जाणे यासारखे व्यायाम आपण करू शकाल.
• ‎याशिवाय लिफ्टऐवजी पायऱ्या चढणे आणि उतरण्याची सवय लावून घ्या.
• ‎ऑफिसमध्ये दीड तासापेक्षा जास्त वेळ खुर्चीत बसू नका. थोडया थोड्या वेळाने पाय हलके करून या आणि डोळ्यांनाही थोडी विश्रांती द्या.
• ‎बैठ्या जीवनशैलीपासून दूर राहा नियमित व्यायाम करा. नियमित व्यायाम करून आपल्या शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करता येते आणि गुड कोलेस्टेरॉलचे (HDL) प्रमाण वाढवता येते. नियमित व्यायामामुळे रक्तदाब आणि वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

योग्य आहार घ्या :
• नेहमी संतुलित, हलका, सुपाच्य आहार घ्या.
• ‎आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, हंगामी फळे, कोशिंबीर, बदाम, मणुका, मोड आलेली कडधान्ये, तंतूमय पदार्थ यांचा भरपूर समावेश करा.
• ‎पुरेसे पाणी प्या. दररोज किमान आठ ग्लास पाणी प्यावे.
• ‎फास्टफूड, जंकफूड, हवाबंद पाकिटे, शीतपेये, विविध मिठाया, बेकरी पदार्थ, डालडा यांपासून दूरच रहावे.
• ‎आहारातील साखर व मीठाचे प्रमाण कमीच असावे. एका दिवसामध्ये 2.5 ग्राम पेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मिठाच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
• ‎तेलकट पदार्थ, चारबीजन्य पदार्थ (फॅट्स), पचायला जड असणारा आहार यांचे सेवन करु नये.
• ‎सॅच्युरेटेड फॅट्स असणारे पदार्थ खाणे टाळावे. पामतेल, नारियल तेल, तूप, लोणी, प्राणीज चरबी, अंड्यातील पिवळा बलक या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे अधिक प्रमाण असते. सॅच्युरेटेड फॅट्सच्या अतिसेवनाने बॅड कोलेस्टेरॉलमध्ये (LDL) वाढ होते.

व्यसनांपासून दूर राहा :
धुम्रपान, मद्यपान, तंबाखुसेवनाने कॅन्सर आणि हृद्यविकार होण्याचा धोका अधिक पटीने वाढतो. यासाठी निरोगी आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे.

ताण घेऊ नका :
• नेहमी ताणतणाव रहित रहावे. राग, क्रोध, शोक, द्वेष, भय यासांरख्या भावनांवर नियंत्रण ठेवावे.
• ‎मानसिक तणावाचा आपल्या आयुष्यात खूप नकारात्मक परिणाम होतो. तज्ञांच्या मते, ताण कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करणे फारच उपयुक्त ठरते.
• ‎आपण ताण कमी करण्यासाठी प्राणायाम, ध्यान धारणा, योगाचा अवलंब करु शकता.
• ‎पुरेशी झोप घ्या. त्यामुळे आपले शरीर आणि मन ताजेतवाने होऊन जाईल.
• ‎तणाव कमी करण्यासाठी, दररोज किमान अर्धा तास आपणास आनंद देणारे एकादे काम करा. फिरायला जाणे, पुस्तके वाचणे किंवा बागकाम इ. कोणताही चांगला छंद लावून घ्या.
• ‎कुटुंबासमवेत मनमोकळ्या गप्पा मारा.
• ‎नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.

नियमित हेल्थ चेकअप करून घ्या :
• नियमित तज्ञांद्वारा आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी.
• ‎यामध्ये रक्तदाब तपासणी, ब्लडशुगर तपासणी, वजन, हृदयाचे चेकअप, डोळ्यांची तपासणी, 50शी नंतरच्या पुरुषांनी प्रोस्टेट ग्रंथीची PSA तपासणी करून घ्यावी.
• ‎नियमित तपासणी केल्यामुळे हृदयविकार, धमनीकठिण्य, उच्च रक्तदाब, पक्षाघात, मधुमेह, कँसर इ विकार नसल्याची खात्री करून घेता येते किंवा ह्या विकारांचे वेळीच निदान होण्यास मदत होते.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

या साध्या गोष्टी लक्षात ठेवून पुरुषांना फिट आणि निरोगी रहाता येईल.

– Dr. Satish Upalkar


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.